Lemon vs Lime : लिंबू आणि लेमनमध्ये फरक काय? दिसायला सारखे पण चवीत आणि आरोग्यात फरक मोठा
लिंबू म्हटलं की लगेच आठवतं सरबत, लिंबूपाणी, लोणचं किंवा भाज्यांना चव आणणारा तडका. पण अनेक लोक लिंबू आणि लाईम दोन्हीला एकच समजतात. इंग्रजीत Lemon आणि Lime असे शब्द वापरले जातात पण हे दोन्ही फळ वेगळे असतात. दिसायला सारखे असले तरी त्यांची चव, रंग, आकार आणि उपयोग यात मोठा फरक आहे. (difference between lemon and lime and its benefits health)
लिंबू म्हणजे काय?
लिंबू हे आकाराने थोडे मोठे आणि पिवळ्या रंगाचे असते. त्याची चव हलकी आंबट आणि थोडी गोडसर असते. सरबत, लोणचे आणि डिटॉक्स पाण्यासाठी लिंबू सर्वात जास्त वापरले जाते. यात व्हिटॅमिन C भरपूर असल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
लाईम म्हणजे काय?
लाईम हे आकाराने लहान, गडद हिरव्या रंगाचे आणि जास्त आंबट असते. त्याचा सुगंधही अधिक तीव्र असतो. त्यामुळे कॉकटेल, सलाड ड्रेसिंग किंवा आंतरराष्ट्रीय सॉसमध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. लिंबू आणि लाईम दोन्ही आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. दोन्हीमध्ये असलेले नैसर्गिक आम्ल शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. परंतु लाईममध्ये फ्लेवोनॉइड्स जास्त असल्याने पचन सुधारण्यात ते अधिक परिणामकारक मानले जाते.
लिंबू सकाळी कोमट पाण्यासोबत घेणे फायदेशीर. तर लाईम चव वाढवण्यासाठी सॅलेड, लोणचे किंवा पेयांमध्ये उत्तम. दोन्ही फायदेशीर आहेत. त्यामुळे कधी लिंबू तर कधी लाईम अशी बदलती साथ ठेवा आणि शरीर निरोगी ठेवा.
आरोग्य फायदे (दोन्हींचे समान)
1) पचन सुधारतात
2) शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात
3) त्वचा स्वच्छ आणि सुदृढ बनते
4) वजन कमी करण्यास मदत
5) इम्युनिटी वाढवतात
लिंबू आणि लाईम दिसायला जरी सारखी भासली तरी दोन्हींचा रंग, चव, पोषक मूल्य आणि वापरयात ठळक फरक आहे. रोजच्या आहारात कधी लिंबू तर कधी लाईम वापरल्याने आरोग्याला दुप्पट फायदा मिळतो. दोन्ही तुमच्या शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
Comments are closed.