तुमच्या हेडफोनमध्ये कानाचा मळ साचलाय? या ट्रिकने करा साफ
आजकाल मोबाईलप्रमाणे हेडफोन देखील दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग झाले आहेत. अगदी कॉल करण्यापासून ते गाणी ऐकण्यापर्यंत हेडफोन वापरला जातो. तसेच गाडी चालवताना कॉल आल्यास हेडफोनची अत्यंत मदत होते. सततच्या वापरामुळे हेडफोन घाण होतात, त्यात कानातील मळ साचतो. त्यामुळे हे हेडफोन कसे स्वच्छ करायचे हा प्रश्न पडतो. काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचे हेडफोन स्वच्छ करू शकता. ( How to clean wax from earphone )
मायक्रोफायबर कापड
हेडफोन्समध्ये जमलेला कानाचा मळ साफ करण्यासाठी तुम्ही मायक्रोफायबर कापड वापरू शकता. हे कापड कोमट पाण्यात भिजवा आणि हलक्या हाताने हेडफोन स्वच्छ करा.
इअरबड
आपण कानातील मळ काढण्यासाठी इअरबडचा वापर करतो. हेच इअरबड वापरून तुम्ही तुमचे हेडफोन देखील स्वच्छ करू शकता. यासाठी कोरड्या इअरबडने हेडफोनमध्ये साचलेला मळ स्वच्छ करावा. तसेच तुम्ही यासाठी टूथपिक देखील वापरू शकता. पण टूथपिकमुळे हेडफोनचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
वायर अशी करा साफ
अनेकदा पांढऱ्या रंगाच्या हेडफोनची वायर घाण होते. यामुळे ती काळपट दिसते. ही वायर स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात डिशवॉश लिक्विड, व्हिनेगर आणि पाणी मिसळा. त्यात मऊ कापड ओले करून ही वायर हलक्या हाताने पुसून घ्या. अशा प्रकारे तुमच्या हेडफोनची घाण झालेली वायरही तुम्ही स्वच्छ करू शकता.
Comments are closed.