पाहाल तिथे मोरचं मोर.. महाराष्ट्रात आहे मोरांचं गाव
‘नाच रे मोरा नाच’.. मोर म्हटलं की आपल्याला आठवतं ते बालगीत आणि मोराचा फुलंलेला अप्रतिम पिसारा.. हा पिसारा फुलवणारा मोर पाहण्यासाठी आपल्याला जंगलात रानावनात किंवा अगदीच अभयारण्यात जाण्याचा प्लॅन आखावा लागतो. पण, तुम्हाला हे माहिती आहे का महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे असंख्य मोरांचे दर्शन घडते. जिथं पाहू तिथे फक्त मोरचं मोर.. घरच्या अंगणात, गावातील रस्त्यांवर, शेतातील बांधांवर फक्त मोरचं मोर. पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येथे येतात. चला जाणून घेऊयात या गावाविषयी,
अष्टविनायकापैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण 23 km अंतरावर ‘मोराची चिंचोली’ पुणे नगर रस्त्यावर शिरूर शिकरापूर जवळच हे गाव आहे. अहमदनगर मार्गाला गेल्यावर डाव्या हाताना शिक्रापूर फाट्यावरून आत गेल्यास हे गाव दिसतं. मोराची चिंचोली हे गाव गर्द झाडीने वेढलेले आणि भरपूर मोर असलेले गाव आहे. या मोरांमुळेच गावाला एक वेगळी ओळख मिळाली आहे.
कधी जावे?
मोराचे थवे पाहण्यासाठी जून ते डिसेंबर हा काळ योग्य आहे. हिवाळ्यात तर मोराचा फुललेला पिसारा पाहून मन मोहून जातं. तुम्ही येथे मनसोक्त फोटोशूट सुद्धा करू शकता. मोरांसह येथे तुम्हाला किकीर्डे, खंड्या, खार, भारद्वाज, कबुतरं सुद्धा पाहायला मिळतील. मोरांच्या दर्शनासह तुम्ही येथे गावच्या गोष्टींच्या आनंद घेऊ शकता. जसे की, शेतीची कामे करणे, रहाटाने पाणी काढणे, हुरडा पार्टी, चुलीवरची भाकरी, पिठलं अशा जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. त्यामुळे सुट्टीच्या दिवसात लहान मुलांसोबत येथे जाण्याचा प्लॅन नक्कीच करता येईल.
हेही वाचा –
Comments are closed.