जास्त वेळ सॅनिटरी पॅड वापरल्याने कॅन्सरचा धोका असतो का? वाचा तज्ञांचे मत
मासिक पाळीच्या काळात अनेक महिला सॅनिटरी पॅड वापरतात. पण याबाबत भीतीदायक माहिती सांगितली जाते. ज्यामुळे सॅनिटरी पॅड वापरणे सुरक्षित आहे का हा प्रश्न पडतो. ठराविक वेळेपेक्षा जास्त काळ सॅनिटरी पॅड वापरणे आरोग्यासाठी घातक ठरते. जास्त वेळ एकच सॅनिटरी पॅड वापरल्याने कॅन्सरचा धोका होऊ शकतो. यामध्ये कितपत तथ्य आहे? जाणून घेऊया तज्ञांकडून… ( Does sanitary pad causes cancer ? )
भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या सॅनिटरी पॅडबाबत काही काही मेडिकल अहवाल समोर आले आहेत. यामध्ये असे आढळून आलं आहे की, या सॅनिटरी पॅडमध्ये कर्करोगाला कारणीभूत ठरणारी रसायने असू शकतात. हे पॅड्स पूर्णपणे कापडापासून बनवलेले नसतात तर त्यात सेल्युलोज जेल वापरण्यात येते. तसेच यात डायॉक्सिन नावाचे रसायन असते. यामुळे ओव्हेरियन कॅन्सरचा धोका असतो.
तसेच दिल्लीतील एका संस्थेने यावर संशोधन केले होते. त्यात असे आढळून आलं होतं की, सॅनिटरी पॅड्समध्ये फ्थैलेट्स, डायॉक्सिन्स, फिनॉल्स आणि पॅराबेन्ससारखी घातक रसायने असतात. यामुळे त्वचेच्या समस्या, हार्मोनल असंतुलन, प्रजनन समस्या आणि कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात.
काय करावे?
स्त्रीरोगतज्ञांच्या मते, बहुतांश स्त्रिया या रक्तप्रवाहानुसार पॅड बदलतात. मात्र असे करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. रक्तप्रवाह कमी असो किंवा जास्त मासिक पाळीच्या काळात दर ४ तासांनी पॅड बदलणे गरजेचे आहे. जर एकच पॅड खूप वेळ वापरलं तर संसर्गासह अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तसेच प्रत्येकवेळी पॅड बदलताना योनीची स्वच्छता करावी. याशिवाय स्वस्त किंवा बनावट पॅड वापरणे टाळावे, त्यामध्ये हानिकारक रसायने असू शकतात.
Comments are closed.