Health Tips: चहाच्या नंतर पाणी प्यावं की आधी? 90% लोकांना माहितच नाही
चहा हा भारतीयांच्या दिवसाची सुरुवात करणारा अविभाज्य भाग आहे. सकाळ असो वा संध्याकाळ, एक कप चहा म्हणजे ऊर्जा, रिलॅक्सेशन आणि गप्पांची साथ. पण एक प्रश्न अनेकांच्या मनात कायम असतो चहा प्यायच्या आधी पाणी प्यावं की नंतर? या छोट्या पण महत्त्वाच्या सवयीमुळे आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. (drink water before or after tea benefits)
चहा-कॉफी आणि शरीरातील पाण्याचं संतुलन
चहा किंवा कॉफीमध्ये कॅफिन असतं, जे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी करतं आणि डिहायड्रेशन निर्माण करतं. म्हणूनच तज्ज्ञ सांगतात चहा प्यायल्यानंतर पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे. हे शरीराला पुन्हा हायड्रेट करतं आणि थकवा कमी करतं. चहाच्या आधी पाणी प्यायल्यास पोट थोडं भरलेलं असल्यामुळे अॅसिडिटी कमी होण्यासही मदत होते.
चहाच्या नंतर पाणी प्यायल्याचे फायदे
1. शरीर हायड्रेट राहते:
कॅफिनमुळे शरीरात पाण्याची कमी होते. पाणी प्यायल्याने शरीरात पुन्हा हायड्रेशन येतं आणि तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता.
2. दातांवरील डाग कमी होतात:
चहा आणि कॉफीतील टॅनिन आणि कॅफिनमुळे दातांवर पिवळसर थर तयार होतो. चहा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने हे घटक धुतले जातात आणि दात स्वच्छ राहतात.
3. अॅसिडिटीपासून सुटका:
रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेतल्याने पोटात जळजळ आणि अॅसिडिटी वाढते. मात्र, त्यानंतर पाणी प्यायल्यास पोटातील आम्लीयता कमी होते आणि त्रास टळतो.
तर मग योग्य वेळ कोणती?
तज्ज्ञांच्या मते चहाच्या आधी थोडं पाणी पिणं चांगलं, जेणेकरून पोट रिकामं राहत नाही. आणि चहा प्यायल्यानंतर नक्की पाणी प्या, ज्यामुळे शरीरातील डिहायड्रेशन टळेल आणि दात व पचन दोन्ही व्यवस्थित राहतील.
 
			 
											
Comments are closed.