Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दाराजवळ ‘या’ गोष्टी ठेवल्याने पालटते नशीब
वास्तुशास्त्रात घराचे मुख्य दार हे महत्त्वाचे मानलं जातं. कारण मुख्य दारातूनच सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करतात. त्यामुळे मुख्य दारासंबंधित काही नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास घरात सुख- समृद्धीत वाढ होते. घराच्या मुख्य दाराजवळ काही गोष्टी ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. ( Home Main Door Vastu Tips )
हॉगचा नाला
वास्तुशास्त्रात घोड्याच्या नालीला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घोड्याची नाल ही घरात समृद्धी आणण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे घराच्या मुख्य दारावर घोड्याची नाल लावणं शुभ मानलं जातं.
गणपती
घरात सुख- समृद्धी टिकवण्यासाठी मुख्य दारावर गणपतीची प्रतिमा किंवा चित्र असावं. पण लक्षात ठेवा गणपतीची प्रतिमा ही घराच्या बाहेर नव्हे तर आतील बाजूला लावावी. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते असं म्हणतात.
धार्मिक प्रतीक
घराच्या मुख्य दारावर नेहमी कुंकवाने धार्मिक चिन्ह काढावी. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक, ओम काढावे किंवा तुम्ही स्टिकर देखील लावू शकता. स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तू आणि दिशा दोष दूर होतो.
लक्ष्मीची पाऊले
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पाऊले लावणे शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी माता ही मुख्य दारातूनच घरात प्रवेश करते, त्यामुळे घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते.
तोरण
घराच्या मुख्य दारावर नेहमी तोरण बांधावे. तोरण हे आंब्याच्या पानांचे असेल तर शुभ ठरते. कारण आंब्याची पाने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तसेच मुख्य दारावर हे तोरण लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
हे टाळा
- घराच्या मुख्य दाराजवळ कधीही चप्पल- बूट आणि झाडू ठेवू नये.
- घराचे मुख्य दार हे नेहमी स्वच्छ असावे.
- घराच्या मुख्य दाराजवळ डस्टबिन आणि सुकलेली रोपं ठेवू नये.
- तसेच घराचा मुख्य दरवाजा उत्तर, पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्याकडे तोंड करून असावा, कारण या दिशा शुभ मानल्या जातात.
 
			 
											
Comments are closed.