The Hottest Place On Earth : जिवंतपणी नरक पाहायचाय? हिंमत असेल तर इथे जाऊन दाखवा
रोजच्या दगदगीतून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून पर्यटनाचे बेत आखले जातात. पण मनमोकळेपणाने भटकंती करताना काही गूढ आणि रहस्य जाणून घेण्याची संधी मिळाली तर..? बऱ्याच जणांना अशा रहस्यमयी ठिकाणी जाण्यात स्वारस्य असते. तुम्हीही त्यापैकी असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी आहे असे समजा. या जगभरात अशी अनेक ठिकाणे अस्तित्वात आहेत. जिथे गेल्यावर तुम्हाला तुमचा मृत्यू जवळून पाहता येईल. अशा मृत्यूच्या दाढेतील पर्यटनस्थळांमध्ये द डनाकिल डेझर्टचा समावेश आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया. (The Hottest Place On Earth The Danakil Desert learn in details)
पृथ्वीवरील नरक
स्वर्ग म्हणजे सुख पण नरक म्हणजे यातना, असे म्हटले जाते. असे ‘पृथ्वीवरील नरक’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘द डनाकिल डेझर्ट’विषयी आपण बोलत आहोत. जिथले तापमान 50 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. हे एक निर्मनुष्य ठिकाण आहे. जे इथिओपियाच्या बेटावर स्थित आहे. इथले वातावरण काही सेकंदात बदलते आणि त्यामुळे अनेक संशोधक या ठिकाणावर अभ्यास करत आहेत. काही संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की, या वाळवंटातून विषारी वायू आणि रसायने बाहेर पडतात. तसेच या वाळवंटात खनिज उत्खननदेखील केले जाते. परिणामी, अनुभवी गाईडशिवाय पर्यटकांना इथे जाण्यास सक्त मनाई आहे.
माणसाचे जगणे अवघड
या ठिकाणी उकळते सल्फरचे झरे, आम्लयुक्त तलाव आणि ज्वालामुखींच्या वाफा वाहणारा परिसर आहे. येथील तापमान सरासरी 45 ते 50 अंश सेल्सिअस इतके असते. धोक्याची बाब अशी की, इथले तापमान अनपेक्षितरित्या बदलू शकते. अनेकदा येथील तापमान 145 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. डनाकिल वाळवंट हे 62 हजार मैलांपेक्षा जास्त क्षेत्रात असून इथल्या उष्णतेला ‘नरकाची आग’ असेही म्हणतात. अशा वातावरणातील काही भागांमध्ये ऑक्सिजन फार कमी आढळतो आणि त्यामुळे कोणत्याही माणसाला फार काळ जिवंत राहणे शक्य होत नाही.
हेही वाचा –
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दाराजवळ ‘या’ गोष्टी ठेवल्याने पालटते नशीब
Comments are closed.