तुम्हालाही सतत बोर होतं? पण हीच असते आयुष्य बदलण्याची चांगली संधी
‘बोर होतंय यार…’ हे वाक्य दिवसभरात किती तरी वेळा प्रत्येकाच्या तोंडावर येतं. कधी कधी कामात व्यस्त असतानाही आपलं मन लागत नाही, त्यावेळीही बोर होत असेल असा आपला समज होतो. पण हे बोर होणं म्हणजे नेमकं काय? तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की हीच नव्याने काही तरी करण्याची संधी असू शकते असं तज्ञ सांगतात. ( what to do when a person is bored )
बोर होणं म्हणजे काय?
बऱ्याचदा अशी परिस्थिती येते जेव्हा कामात मन लागत नाही, लो फील होतं, कोणत्याही गोष्टीबाबत उत्साह नसतो. अशा वेळीच एखाद्या व्यक्तीला बोर होतं म्हणजेच कंटाळा येतो. बहुतांश वेळा काम नसेल किंवा रिकामा वेळ असेल तेव्हा बोर होतं. पण बोर होणं ही नवीन काही तरी करण्याची संधी असू शकते असं तज्ञ सांगतात.
जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे नवीन काही करण्यासारखं नसते, दैनंदिन जीवनातील समान रूटीनमुळे कंटाळा येतो. अशा वेळीच काही तरी क्रिएटिव्ह विचार करण्याची संधी मिळू शकते. कारण ही अशी वेळ असते जेव्हा मन कोणत्याही इतर कामात गुंतलेले नसते. एखाद्या व्यक्तीचे मन शांत असतं तेव्हा तो अधिक सर्जनशील विचार करू शकतो. त्यामुळे जर तुमच्याकडे रिकामा वेळ असेल आणि नवीन काही करण्यासारखं नसेल तेव्हा तुम्ही विचार करा, आयुष्यात आणखी काय करता येईल, नव्या योजना आणि कल्पना तुमच्या जवळच्या लोकांशी शेअर करा. यामुळे नक्कीच फायदा होतो.
म्हणजेच प्रत्येकाने आपल्यातील ऊर्जेचा योग्य वापर करावा. रिकाम्या वेळेत हातावर हात ठेवून बसून कंटाळा येण्यापेक्षा तुमचा छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ जर तुम्हाला चित्र काढायला आवडत असेल तर ते काढा. अशावेळी तुम्हाला क्रिएटिव्ह काही सुचण्याची शक्यता जास्त असते. तसेच मूडही फ्रेश होण्यास मदत होते.
कधीकधी आपल्याला तेच तेच काम करण्याचा कंटाळा येतो. व्यस्त आणि एकसारख्या जीवनशैलीमुळे थकवा जाणवतो. अशावेळी मनही उदास होतं. त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे अधूनमधून तुम्ही तुमच्या बिझी लाईफस्टाईलमधून ब्रेक घ्या. मनाला ताजेतवाने करण्यासाठी स्वतःला ब्रेक देणंही गरजेचं आहे.
Comments are closed.