वर्षातून एकदा कुलदैवतेचं दर्शन का घ्यावं?
हिंदू धर्मात कुल देवी किंवा कुल देवतेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. कुटूंबाच्या म्हणजेच कुळाच्या देवाला ‘कुलदैवत’ असे म्हणतात. प्रत्येक कुटूंब हे कोणत्या ना कोणत्या ऋषींचे वंशज आहे. ज्यावरून त्यांचे कुळ ओळखले जातात. आपल्या पिढ्या न पिढ्या या देवतेची पूजा करत आलेल्या असतात. घरातील कोणत्याही शुभ कार्यात जसे लग्न, मुंडन संस्कार किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात, कुटुंबातील देवतेची निश्चितपणे पूजा केली जाते, त्यांना आमंत्रण दिले जातं. मान्यतेनुसार, कुटुंबातील देवतांची पूजा केल्यान त्यांचे आशीर्वाद नेहमीच राहतात. याशिवाय असेही सांगितले जात की, वर्षातून एकदा कुलदैवतेला अवश्य जाव. पण, यामागचे कारण काय? जाणून घेऊयात
होणारे लाभ –
- कुलदैवत आपल्या कुळाचे रक्षण करणारे दैवत आहे. वर्षातून एकदा दर्शन घेतल्यानं आपण त्याच्या छायेखाली राहतो, त्यांची कृपा आपल्या कुटूंबावर राहते. त्यामुळे वर्षातून एकदा कुलदैवतेचे दर्शन घ्यावं असे सांगितले जातं.
- वर्षातून एकदा कुलदेवतेची दर्शन घेतल्यानं वंशांच्या उद्धारासाठी मदत होते असे मानले जाते.
- अनेक घराण्यांमध्ये विवाह किंवा मुंज यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी कुलदैवतेची पूजा करण्याची प्रथा असते. जी कुळाच्या रक्षणासाठी आवश्यक सांगितली जाते. त्यामुळे आवर्जून वर्षातून एकदा कुलदैवतेची पूजा आणि दर्शन सहकुटूंब घ्यायला हवं.
- जेव्हाही तुम्ही कुलदैवतेचे दर्शन घेऊन येता तेव्हा तुम्हाला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि आजूबाजूस आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती होते.
दर्शन न घेतल्यास होऊ शकतात हे परिणाम –
कुलदेवतेची पूजा सोडल्यानंतर, काही वर्षे कोणताही विशेष फरक जाणवत नाही. पण, जेव्हा संरक्षणात्मक वर्तुळ काढून टाकले जाते तेव्हा अपघात, नकारात्मक ऊर्जा, कामात अडथळे, अप्रगती, कलह, अशांतता सुरू होते.
(टीप – वरिल माहिती विविध स्त्रोतावरून घेण्यात आली आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. only manini या तथ्यांची पुष्टी करत नाही.)
हेही वाचा – Chanakya Niti : जिभेवर नियंत्रण असणं का गरजेचं?
 
			 
											
Comments are closed.