New Born Baby Parenting: बाळाच्या जेवणात मसाले कधीपासून घालावे? वाचा बालरोगतज्ञांचा सल्ला
पालकांना आपलं मुल हे निरोगी हवे असते. नवजात बाळाला पहिले ६ महिने आईच्या दुधातून आवश्यक पोषण मिळते. ६ महिन्यांपर्यंत बाळासाठी आईचे दूधच सर्वोत्तम ठरते. बाळ ६ महिन्यांचं झालं की त्याला हलकं अन्न देणं योग्य ठरते. पण यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे बाळाच्या अन्नात मसाले कधीपासून घालू शकतो? याबाबत बालरोगतज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ( When should you give spicy food to your baby? )
1 तज्ञांच्या मते, ६ महिन्यांनंतर बाळाला सुरुवातीला हलके अन्न द्यावे. ६ महिन्यांनंतर बाळाला भाताची पेज, डाळीचे पाणी, फळांचे ज्यूस देऊ शकता. मात्र यामध्ये मसाल्यांचा वापर करू नये. हे अन्न साधं असावं. यामुळे हळूहळू बाळाला चवीची सवय होते.
2 बाळ ७ ते ८ महिन्यांचे झाल्यावर बाळाच्या अन्नात सौम्य मसाले घालू शकता. जसे की, हळद, जिरे पूड, धणे पूड किंवा हिंग. कारण यामुळे पदार्थात चव येतेच शिवाय पचनसंस्थाही सुधारते. मात्र लक्षात ठेवा फार उग्र मसाले बाळाच्या अन्नात घालू नयेत. कारण उग्र मसाल्यांमुळे बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हळूहळू एक- एक मसाल्याची बाळाला सवय लावावी.
3 ८ महिने ते १ वर्षाच्या बाळाला मसाल्यांची सवय होते. अशावेळी तुम्ही बाळाला तिखटाची चव देण्यासाठी सौम्य काळी मिरीपूड वापरू शकता. काळी मिरीपूड वापरतानाही प्रमाण मर्यादित ठेवावं. बाळाच्या जेवणात नेहमी सौम्य मसाले असावे यामुळे त्यांना जळजळ, पचनाचा त्रास होत नाही.
4 लहान बाळांची पचनक्रिया ही संवेदनशील असते. त्यामुळे त्यांच्या जेवणात नेहमी मर्यादित प्रमाणात मसाल्याचा वापर करावा. तसेच हे मसाले ताजे असणेही गरजेचं आहे.
Comments are closed.