Tulsi Vivah 2025: लग्न जुळण्यात अडचण येते? तुळशी विवाहाच्या दिवशी हे उपाय केल्याने जुळून येतील योग
हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा आहे. तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते असे म्हणतात. या दिवशी तुळशी आणि भगवान विष्णू यांचे शालिग्राम रूप यांचा विवाह लावला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील ताणतणाव, संघर्ष आणि समस्या दूर होतात. तसेच घरात सुख- समृद्धीत वाढ होते. तुळशीचे लग्न हे रविवारी 2 नोव्हेंबर 2025 रोजी असणार आहे. ( Tulsi Vivah 2025 )
जर तुमचे लग्न जुळण्यात अडचण येत असेल तर या दिवशी काही उपाय केल्याने तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतात. ( Tulsi Vivah 2025 Upay for marriage )
तुळशी आणि शालिग्रामची पूजा
या दिवशी तुळशी आणि विष्णू रुपी शालिग्राम यांची पूजा करावी. तसेच गरिबाला किंवा ब्राह्मणाला कपडे, मिठाई आणि फळे दान करा. यामुळे लवकर विवाह जुळण्याचा योग येतो असं म्हणतात.
तुळशीला सोळा शृंगार अर्पण करा
या दिवशी तुळशी पूजनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. तुळशीचे लग्न लावताना तिला सोळा शृंगार अर्पण करावे. यामुळे तुमचं लग्न लवकर जुळते, शिवाय वैवाहिक जीवनातील ताणतणाव कमी होतात.
तुळशीला हळद अर्पण करा
कितीही प्रयत्न करून जर तुमचं लग्न जुळत नसेल तर या दिवशी तुळशीला हळदीचे दूध अर्पण करा. यामुळे गुरु ग्रह बळकट होतो आणि विवाहाचे योग जुळून येतात. तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यात हळद घालून स्नान करा.
तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा
संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा. त्यानंतर शक्य असल्यास तुळशी चालीसाचे पठण करा.
तुळशी विवाहाचे शुभ मुहूर्त (तुळशी विवाह शुभ मुहूर्त)
या दिवशी ब्रह्म मुहूर्त हा पहाटे 4:59 ते पहाटे 5:49 पर्यंत असेल. अमृत काळ हा सकाळी 9:29 ते 11:00 पर्यंत आहे. अभिजित मुहूर्त सकाळी 11:59 ते दुपारी 12:45 पर्यंत असणार आहे आणि गोधुली मुहूर्त संध्याकाळी 6:04 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत आहे. या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुळशीचे लग्न करू शकता.
धार्मिक महत्त्व (तुळशी विवाहाचे महत्त्व)
हिंदू धर्मानुसार, तुळशी पूजनाला विशेष महत्त्व असते. तर शास्त्रानुसार तुळशीची पूजा केल्याने आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख-शांती टिकून राहते. तसेच घरातील आर्थिक स्थिती देखील चांगली राहते. त्यामुळे या दिवशी संध्याकाळी तुळशीचे लग्न आणि पूजा करणे शुभ मानले जाते.
हेही वाचा: Tulsi Vivah 2025: तुळशीजवळ कधीही ठेवू नये ‘या’ गोष्टी; अन्यथा वाढतील आर्थिक अडचणी
Comments are closed.