Women’s Health: मुलींच्या विशीनंतर होते हार्मोनल चेंजेसला सुरुवात, आहारात करा ‘हे’ बदल

स्त्री म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा केंद्रबिंदू. तिचं आरोग्य चांगलं असेल तर संपूर्ण घर निरोगी राहू शकतं. आजच्या वेगवान जीवनशैलीत महिलांनी स्वतःकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं झालं आहे. विशेषतः वयाच्या 20व्या वर्षानंतर शरीरात नैसर्गिकरीत्या अनेक हार्मोनल बदल होऊ लागतात. हे बदल शरीर, मन आणि आरोग्यावर थेट परिणाम करतात. त्यामुळे या काळात आहार आणि दैनंदिन सवयींमध्ये काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. (womens health after 20 hormonal changes and diet tips)

1) दुधाचा नियमित समावेश
२० वर्षांनंतर तरुणींच्या हाडांमध्ये आणि स्नायूंमध्ये होणारे बदल लक्षात घेऊन दुधाचे सेवन महत्त्वाचे ठरते. दुधात असलेले कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन डी आणि रिबोफ्लेविन हाडांना बळकटी देतात आणि शरीराला आवश्यक उर्जा देतात. रोज किमान एक ग्लास दूध घेण्याची सवय लावल्यास हाडांचे विकार, थकवा आणि स्नायूंची कमजोरी टाळता येते.

2) संत्र्याचा रस
हार्मोनल बदलांमुळे तरुणींमध्ये थकवा, चिडचिड आणि त्वचेच्या समस्या दिसतात. अशा वेळी संत्र्याचा ताजा रस दिवसातून एकदा घ्यावा. तो शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवतो आणि त्वचा, केस तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. जेवणाच्या एक तास आधी किंवा जेवणानंतर दोन तासांनी घेतल्यास अधिक फायदा होतो.

3) टोमॅटो
टोमॅटोमधील लायकोपीन आणि व्हिटॅमिन A, C हे घटक महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ते त्वचेवरील वृद्धत्वाची चिन्हे कमी करतात आणि शरीरातील पेशींना निरोगी ठेवतात. तसेच टोमॅटोमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतात आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून संरक्षण देतात.

4) हिरव्या पालेभाज्या
हिरव्या भाज्यांमध्ये लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन K आणि फायटोन्यूट्रिएंट्स मुबलक प्रमाणात असतात. या पोषक घटकांमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि हाडे मजबूत होतात. दररोजच्या आहारात पालक, मेथी, शेवगा, चौलाई यांसारख्या भाज्यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक खनिजे नैसर्गिकरित्या मिळतात.

5) सुकामेवा
सुकामेवा म्हणजे प्रथिने, फायबर, ओमेगा-३ आणि निरोगी चरबींचा नैसर्गिक खजिना. २० वर्षांनंतर नियमितपणे बदाम, पिस्ता, अक्रोड, मनुका आणि अंजीर खाण्याची सवय ठेवावी. हे घटक शरीराला उर्जा देतात, मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि भविष्यातील आरोग्याच्या समस्या टाळण्यास मदत करतात.

6) फायबर समृद्ध पदार्थ
ब्राऊन राईस, ज्वारी, बाजरी, ओट्स किंवा क्विनोआसारख्या धान्यांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील फायबरचं प्रमाण वाढतं. यामुळे अपचन, गॅस, पोट फुगणं अशा समस्या कमी होतात आणि पचनसंस्था संतुलित राहते.

महिलांनी वयाच्या २०व्या वर्षानंतर आहाराकडे आणि शरीराच्या संकेतांकडे लक्ष देणं अत्यावश्यक आहे. छोट्या सवयी आणि योग्य आहारामुळे हार्मोनल बदलांशी सामना सहज करता येतो. योग्य वेळी योग्य पोषण मिळाल्यास महिलांचं शरीर मजबूत राहतं आणि मानसिक आरोग्यही संतुलित राहते.

Comments are closed.