Chanakya Niti : स्वत:च्या भल्यासाठी इतरांना चुकूनही सांगू नयेत या गोष्टी

आचार्य चाणक्य यांचे नितीशास्त्र हे सामान्य व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित आहे. चाणक्य यांचा प्रत्येक संदेश आपल्याला आयुष्य कसे जगावे याची शिकवण देतो. यामुळे चाणक्य निती लोकप्रिय आहे. आजकालच्या काळात कोणती व्यक्ती कशी आहे, हे कळणं खूप कठीण आहे. त्यात जर तुम्हाला सहजपणे सर्वांना गोष्टी सांगायची सवय असेल तर अशाने जगणं कठीण होऊ शकते. हेच नुकसान टाळण्यासाठी चाणक्य नीतीनुसार कोणत्या गोष्टी इतरांना सांगू नये हे जाणून घेऊयात.

पती-पत्नीमधील संवाद-

पती-पत्नीचे संबंध खासगी असतात. यामुळे चाणक्य नीतीनुसार पती-पत्नीतील वाद किंवा सुसंवाद तिसऱ्या व्यक्तीला सांगू नये. यामुळे दाम्पत्य जीवन बिघडू शकते.

योजना –

आचार्य चाणक्य सांगतात की, कामाशी संबंधित भविष्यासाठी काही योजना आखल्या असतील तर त्याची उघडपणे चर्चा करू नये. यामुळे अडचणी येऊ शकतात. तुमच्या योजना पूर्ण झाल्यावरचं सांगावे.

हेही वाचा – Morning Habits :सकाळी उठल्यावर हातांचे तळवे का पाहावेत? वाचा यामागील कारण

ताकद आणि कमजोरपणा –

चाणक्य नीतीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, तुमची ताकद आणि कमजोरपणा कुणालाही सांगू नये. असे केल्याने तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागणार नाही.

कुटूंबातील वाद-विवाद –

कुटुंबात छोटे मोठे वाद होतात. हे वाद कधी संपत्तीवरून तर कधी मानपानावरून. पण जर त्याबद्दल तुम्ही लोकांना सांगत सुटलात तर समोरची व्यक्ती तुम्हाला योग्य सल्ला देईलच असे नाही. त्यामुळे आपल्या घरातील गोष्टी चार भिंतीच्या आतच ठेवा.

उत्पादन –

चाणक्या नीतीनुसार तुमच्या उत्पादनाबद्दल कोणालाही सांगू नये. कमाईचे स्त्रोत चुकूनही उघड करू नये. कारण उत्पन्न कळल्यावर पातळी ठरवली जाते.

अपमानाच्या घटना –

जर तुमचा कधी कोणी अपमान केला असेल तर त्याबद्दल कधीही चारचौघात बोलू नये. यामुळे तुमच्यावरच प्रश्नचिन्ह उभारला जाईल. तसेच तुमची नातलगांमध्ये, कार्यक्षेत्रामध्ये असलेली प्रतिमा डागाळेल.

हेही वाचा – Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दाराजवळ ‘या’ गोष्टी ठेवल्याने पालटते नशीब

Comments are closed.