Manifestation: मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? मॅनिफेस्ट केल्याने खरंच इच्छा पूर्ण होतात का?
‘मॅनिफेस्टेशन’ हा शब्द आजकाल सतत कानावर पडतो. सोशल मीडिया आणि जनरेशन-झेडमध्ये मॅनिफेस्टेशन हा शब्द हमखास वापरला जातो. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मॅनिफेस्ट केलं जातं. पण मग हे मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय? खरंच मॅनिफेस्ट केल्याने इच्छा पूर्ण होतात का? हा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया मॅनिफेस्टेशन आणि त्यामागचे नेमकं तथ्य काय आहे. ( What is Manifestation And How does it works ? )
मॅनिफेस्टेशन म्हणजे काय?
आपण जो विचार करतो तेच आपल्याला मिळते; याच भावनेला मॅनिफेस्टेशन म्हंटलं जातं. याला ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ असंही म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण खूप मेहनत घेतात मात्र कुठेतरी त्यांच्या मनात अपयशाची भीती घर करून बसलेली असते. त्यामुळे आपण कितीही प्रयत्न केले तरी मनात असलेल्या नकारात्मक विचारांमुळे एखाद्या कामात अपयश येण्याची शक्यता वाढते. म्हणूनच असं म्हणतात की तुम्हाला जे मिळवायचं आहे त्याबद्दल तुम्ही सकारात्मक असणं गरजेचं आहे. तुमच्या डोक्यात आणि मनात सकारात्मक विचार असावे. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि ध्येय साध्य करण्यासाठी मदत होते.
मॅनिफेस्टे केल्याने इच्छा पूर्ण होते?
एखादी गोष्ट मॅनिफेस्टे केल्यानं खरंच ती मिळते हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही प्रमाण नाही. पण संशोधनातून असं समोर आलं आहे की, मॅनिफेस्ट केल्यानं माणसाचा दृष्टिकोन हा सकारात्मक असतो ज्यामुळे यश मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच मॅनिफेस्टेशनमुळे सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होतात, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो.
मॅनिफेस्टेशन कसं करावं? (प्रकटीकरण कसे करावे)
- मॅनिफेस्टेशन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचे ध्येय माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल स्पष्ट नसाल तर तुम्ही ते कधीच साध्य करू शकणार नाही.
 - तुम्ही तुमचे ध्येय निश्चित केले की मनातून सर्व नकारात्मक विचार काढून टाका. यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकत नाही.
 - तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तयारी सुरू करा. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतात, हेही तितकंच सत्य आहे.
 - या संपूर्ण काळात तुम्ही सकारात्मक असणं गरजेचं आहे. यामुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता. सुरुवातीला काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरी खचून जाऊ नका. हे आपल्याला करायचंच आहे हा विचार मनात ठेवून काम सुरू ठेवा.
 - कष्ट आणि प्रामाणिकपणामुळे तुम्ही तुमच्या ध्येयात यशस्वी व्हाल. यादरम्यान तुमच्या मदतीला आलेल्या प्रत्येकाचे तुम्ही आभारही मानले पाहिजेत.
 
			
											
Comments are closed.