Duppata Designs : हे दुप्पटे तुमच्याकडे असायलाच हवेत !
वेस्टर्न आउटफिट कितीही प्रकारचे असले तर प्रत्येक मुलीच्या वॉडरोबमध्ये साधे कुर्ते, डिझायनर कुर्ते असतात. ऑफिस, कॉलेजमध्ये घालण्यासाठी कुर्ते हे साधा पण ट्रेंडी लूक देणारे कपडे आहेत. हल्ली बऱ्याच मुली जीन्स किंवा ट्राउझर्सवर शॉर्ट कुर्ती स्टाईल करण्यास पसंती दर्शवतात. अशावेळी तुम्ही हे कुर्ते आणखीन स्टायलिश दिसण्यासाठी यावर दुप्पटे स्टाईल करू शकता.
शिफॉन स्कार्फ –
एथनिक लूकसाठी तुम्ही कोणत्याही कुर्त्यासोबत शिफॉन कुर्ता स्टाईल करू शकता. हे दुप्पटे वजनाने कमी असतात. त्यामुळे कॅरी करणे सोप्पे जाते. हलक्या शेड्सचे दुप्पटे कोणत्याही गडद रंगाच्या कुर्त्यासोबत स्टाईल करका येतील.
रेशीम स्कार्फ –
बनारसी कुर्ता घालायची सवय असेल तर सिल्क फॅब्रिकचा स्कार्फ खरेदी करावा. बनारसी कुर्त्यासोबत सिल्क फॅब्रिकचा स्कार्फ स्टाईल करता येईल. वेडिंग-पार्टी लूकसाठी हा कॉम्बो परफेक्ट असेल.
हेही वाचा – Multani Mitti : मुलतानी मातीने खुलवा चेहऱ्याचे सौंदर्य, वापरण्याची पद्धत जाणून घ्या
भरतकाम केलेला स्कार्फ –
विविध नक्षी असलेला रंगीत दुप्पटा तुमच्याकडे असायला हवा. पांढऱ्या किंवा लाईट शेडच्या कुर्त्यासोबत सहज मॅच करता येईल. कोणत्याही सोहळ्यासाठी कुर्ता-पायजमा घालणार असाल तर हा पर्याय रिच लूक देईल.
हाताने पेंट केलेले स्कार्फ –
हल्ली बाजारात हाताने रंगवलेले डिझायनर दुप्पटे मिळतात. याची किंमत जास्त असते. पण, कोणत्याही कार्यक्रमात, लग्नात आकर्षक लूक मिळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
दुपट्टा ड्रेप करण्याच्या स्टाईल –
- दुपट्टा एका खांद्यावर घेणे ही एक सोपी पण स्टायलिश पद्धत आहे.
 - तुम्ही दुपट्टा दोन्ही खांद्यांवर व्यवस्थित घेऊ शकता, ज्यामुळे पारंपरिक आणि आकर्षक लूक मिळेल.
 - दुपट्ट्याच्या एका टोकाला कंबरेला पिनअप करून तो दुसऱ्या खांद्यावर घेणे ही एक स्टायलिश पद्धत आहे, जी तुमचा
 - ड्रेस अधिक व्यवस्थित दिसण्यास मदत करते.
 - सण, उत्सव किंवा लग्नसराईसाठी तुम्ही लेहेंगा किंवा ड्रेससोबत दुपट्ट्याच्या खास डिझाइनर स्टाईल्स वापरू शकता.
 
हेही वाचा – Eye Makeup : दररोज लायनर, काजळ लावणे पडू शकते महागात
			
											
Comments are closed.