दिवसेंदिवस प्रदुषणात वाढ, अशी घ्या लहान मुलांची काळजी

दिल्लीपाठोपाठ आता मुंबई पूण्यात वाढलेल्या प्रदुषणामुळे आणि विषारी हवेमुळे आरोग्यासंबंधी अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस प्रदूषणाची पातळी वाढत चालल्याने आरोग्याशी संबंधित अनेक उद्भवत आहेत. हवेत आढळणारे हानिकारक कण विशेषत: लहान मुले आणि वृद्धांना जास्त त्रासदायक ठरत आहेत. यामुळे खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, थकवा यासारखे त्रास सुरू झाले आहेत. ही गंभीर परिस्थिती ओळखून बालरोगतज्ज्ञांनी वायू प्रदूषणापासून लहान मुलांचे संरक्षण कसे करायचे, त्यांची काळजी कशी घ्यायची यासंदर्भात टिप्स दिल्या आहेत.

खिडक्या – दार बंद करा –

सकाळी आणि संध्याकाळी हवेतील प्रदुषणाचा स्तर जास्त असतो. त्यामुळे यावेळी खिडकी आणि दरवाजे बंद ठेवावेत. विशेष करून संध्याकाळच्या वेळी दरवाजे बंद ठेवावेत, जेणेकरून प्रदुषित हवा घरात येणार नाही.

एअर प्युरिफायर –

मुलांच्या खोलीत एअर प्युरिफायर लावणे शक्य असेल तर एका उत्तम दर्जाचे प्युरिफायर लावा. एअर प्युरिफायर हवेतील हानिकारक कण कमी करतात आणि खोली स्वच्छ करतात.

हेही वाचा – Home Decor Tips: हवा शुद्ध करून ऑक्सिजन लेव्हल वाढवतात हे इन डोअर प्लांट्स

बाहेर खेळायला पाठवू नका –

हवेची गुणवत्ता जास्त खराब असेल तर अशा वातावरणात मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका. त्याऐवजी इनडोअर गेम्स खेळण्यास द्यावे.

व्हिटॅमिन सी युक्त आहार –

व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्यावा. मुलांच्या आहारात आवळा, संत्री, किवी, टोमॅटो, लिंबी यांचा समावेश करावा. व्हिटॅमिन सी प्रदूषणापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी फायदेशीर असते.

मास्क घाला –

लहान मुलांना मास्क घालावे. तुम्ही धूळ, हवेतील विषारी कण यापासून त्यांचे सरंक्षण करण्यासाठी मुलांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याची सवय लावावी.

हेही वाचा – Mental Health Tips: ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोक्यात येतात नको ते विचार

Comments are closed.