Relationship: प्रत्येक मुलगी नवऱ्यापासून लपवते हे सीक्रेट्स; जाणून घ्या कारण

कोणतेही नातं हे विश्वासावर आधारित असतं असं म्हणतात. नात्यात एकमेकांना सर्व काही सांगणं, एकमेकांशी सर्व गोष्टी शेअर करणं, भावना व्यक्त करणं गरजेचं असतं. मात्र असं असलं तरी मुली त्यांच्या पार्टनरपासून काही गोष्टी लपवतात. हे असे सीक्रेट्स असतात जे पार्टनरला सांगण्याची मुलींना भीती वाटते. पण त्यामागचे नेमकं कारण काय? आणि ते सीक्रेट्स काय असतात? जाणून घेऊया… ( Women hide these secrets from their husband after marriage )

मागील जीवन
प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो. तो विसरून नात्यात मूव्ह ऑन करणं गरजेचं असतं. मात्र अनेक महिला लग्नानंतर आपल्या भूतकाळातील काही नाती किंवा प्रेमप्रकरणं नवऱ्यापासून लपवतात. कारण मुलींना अशी भीती असते की नवऱ्याला या गोष्टी सांगितल्यावर त्याच्या मनात संशय किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतो.

तुलना करा
लग्न झाल्यावरही बऱ्याचदा मुलींच्या मनात आपल्या नवऱ्याची तुलना एक्स बॉयफ्रेंडशी होत असते. पण मुली या गोष्टी आपल्या नवऱ्याला सांगत नाहीत. कारण यामुळे त्याला वाईट वाटेल, राग येईल किंवा त्याचा अपमान होईल असं मुलींना वाटतं.

शारीरिक असुरक्षितता
स्त्रियांच्या मनात असुरक्षिततेची भावना असल्यानं स्वतःच्या शरीरयष्टीबद्दल नवऱ्याशी बोलणं त्या टाळतात. कारण यामुळे आपल्यातील कमीपणा पार्टनरसमोर येईल अशी त्यांची भावना असते. महीला पुरुषांपेक्षा जास्त घाबरतात की चुकून त्यांना नकार मिळायला नको.

खर्चाची गुपिते
आर्थिक स्वातंत्र्य हे स्त्रियांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे अनेकदा महिला घर खर्चातून पैशांची बचत करतात किंवा कधी कधी नवऱ्याला न सांगता काही गोष्टींवर खर्च करतात. पण शक्यतो नवऱ्यासोबत पैशांचा हिशोब करणं महिला टाळतात.

मनातील भावना
बहुतेक स्त्रिया आपल्या माहेरच्या किंवा सासरच्या काही गोष्टी नवऱ्याशी शेअर करत नाहीत. त्यांना वाटते की नवऱ्याला चिंता वाटेल किंवा तो या गोष्टी समजून घेऊ शकणार नाही. तसेच बहुतांश वेळा आपण न बोलता नवऱ्यानं आपल्याला समजून घ्यावं असं मुलींना वाटत असतं.

Comments are closed.