या नदीतील पाण्याला स्पर्श करणे ठरते पाप, जाणून घ्या भारतात कुठे आहे ही नदी?

भारतात अनेक नद्या आहेत. प्रत्येक नदीची एक कहाणी आणि इतिहास वेगळा आहे. नदीतील पाणी फक्त मनुष्यांसाठीच नाही तर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी वरदान आहे. गंगा, यमुना, कृष्णा यांसारख्या नदींची तर भारतात पूजा केली जाते. मात्र, आपल्या भारतात अशी एक नदी आहे जी शापित नदी म्हणून ओळखली जाते. या नदीच्या पाण्याला कोणी स्पर्श देखील करत नाही. असे सांगितले जाते की या नदीच्या पाण्याला स्पर्श केला तर पूण्य पापात बदलते, वाईट होते. चला जाणून घेऊयात या नदीविषयी.

कर्मनाशा नदी –

या नदीचं नाव आहे कर्मनाशा नदी. कर्मनाशा नदीचा उगम बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून झाला. नदी यूपीमध्ये सोनभद्र, चंदौली, वाराणसी आणि गाजीपूर अशी वाहते. नंतर बिहारमध्येच बक्सरजवळ गंगा नदीला जाऊन मिळते. ‘कर्मनाशा’ हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. पहिला ‘कर्म’ आणि दुसरा म्हणजे ‘नाश’. असे मानले जाते की, कर्मनाशा नदीच्या पाण्याला स्पर्श केल्याने तुम्ही करणार असलेलं काम बिघडतं आणि चांगली कर्म मातीत मिसळतात. त्यामुळे या नदीच्या पाण्याला कोणीही हात लावत नाही.

हेही वाचा – The Hottest Place On Earth : जिवंतपणी नरक पाहायचाय? हिंमत असेल तर इथे जाऊन दाखवा

पौराणिक कथा –

कर्मनाशा नदी शापित असण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. अशी मान्यता आहे की, राजा हरिशचंद्राचे पिता सत्यव्रतने एकदा गुरु वशिष्ठ यांच्याकडे स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, गुरु वशिष्ठांनी त्यांना नकार दिला. यानंतर सत्यव्रत राजाने गुरु विश्वामित्रांकडे आग्रह केला. वशिष्ठ आणि विश्वामित्रांची शत्रूता असल्याने विश्वामित्रांनी आपल्या तपाच्या जोरावर सत्यव्रत राजाला स्वर्गात पाठवलं. हे पाहून इंद्रदेव संतापले आणि राजाला उलटे लटकावून पुन्हा पृथ्वीवर पाठवले. यावेळी विश्वामित्रांनी राजाला स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्यावर थांबून ठेवले आणि देवतांसोबत युद्ध केले. यावेळी राजा उलटा लटकत असल्याने त्याच्या तोंडातील लाळ जमीनीवर गळू लागली. त्या लाळेपासूनच कर्मनाशा नदीचा उगम झाला असे म्हणतात. नंतर गुरू वशिष्ठ यांनी सत्यव्रतला श्राप दिला, ज्यामुळे नदी शापित झाली अशी मान्यता आहे.

हेही वाचा – गोव्यात स्वस्त दारू मिळण्याचं नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

Comments are closed.