Iron Cleaning: इस्त्रीवर गंज चढल्याने कपड्यांवर डाग पडतात? या टिप्सने २ मिनिटांत चमकेल इस्त्री

कपड्यांवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी प्रत्येक घरात इस्त्रीचा वापर केला जातो. पण बऱ्याचदा इस्त्रीवर गंज चढल्याने कपड्यांवर डाग पडतात. अशावेळी काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमची इस्त्री पुन्हा एकदा नव्यासारखी बनवू शकता. अगदी घरी उपलब्ध असलेलं साहित्य वापरून तुम्ही इस्त्री दोन मिनिटांत चमकवू शकता. यासाठी तुम्हाला लिंबू, बेकिंग सोडा आणि टूथपेस्ट लागेल, जे प्रत्येकाच्या घरात असतेच. ( Homemade Remedies And Tips to clean burnt iron )

लिंबू
सर्वात आधी लिंबाचे पाणी तयार करा आणि त्यात कापसाचा गोळा भिजवा. हा कापसाचा गोळा काही मिनिटांसाठी इस्त्रीच्या गंजलेल्या भागावर लावा. त्यानंतर ओल्या स्वच्छ कापडाने इस्त्री पुसून घ्या. लिंबूमुळे डाग सहज निघून जातात. हा सर्वात सोपा उपाय आहे.

बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा लिंबाच्या रसात मिसळून पेस्ट बनवा. इस्त्रीच्या गंजलेल्या भागावर काही मिनिटे ही पेस्ट लावून ठेवा. एका जुन्या टूथब्रशने घासून घ्या. यामुळे तुमची इस्त्री पुन्हा नव्यासारखी चमकेल.

टूथपेस्ट
२-३ चमचे बेकिंग सोडा आणि टूथपेस्ट मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट गंजलेल्या भागावर लावा आणि नंतर मऊ कापडाने इस्त्री पुसून घ्या.

चुना आणि मीठ
चुना आणि मीठ समप्रमाणात एकत्र घ्या. ते व्यवस्थित कालवून इस्त्रीवर जिथे डाग पडले आहेत, अशा ठिकाणी लावा. १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर इस्त्रीवर पाणी शिंपडून हा भाग थोडा ओला करून घ्या आणि कपड्याने डाग घासून स्वच्छ करा. जर हा डाग कठीण असेल तर हा उपाय २ ते ३ वेळा करा.

सांडपेपर
सॅण्ड पेपरचा वापर करून इस्त्रीवरचे गंजाचे किंवा जळालेले डाग पटकन काढता येतात. हा उपाय करण्यासाठी इस्त्रीवर थोडं पाणी शिंपडून तो डाग ओलसर करून घ्या. आता या ओलसर डागावर सॅण्डपेपर घासा. तसेच सॅण्डपेपर हळूवारपणे घासा. असे दोनदा तरी करा जेणेकरून हा डाग स्वच्छ होईल.

जुन्या डागांसाठी हायड्रोजन पेरोक्साइड
जर वरील उपाय केल्यानंतरही इस्त्रीवरील डाग जात नसतील तर तुम्ही इस्त्रीवर थोडे हायड्रोजन पेरोक्साइड लावा. काही मिनिटांनंतर लिंबू-बेकिंग सोडा पेस्ट लावा आणि घासून घ्या. यामुळे इस्त्री स्वच्छ होईल आणि त्यावरील डाग सहज निघतील. हे सर्व उपाय करताना इस्त्री थंड असणं गरजेचं आहे.

Comments are closed.