Central Railway : कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाचा मुंबईकरांना असाही फटका; लोकलच्या धडकेत तिघांचा मृत्यू
मुंबई : मुंब्रा लोकल अपघाताप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या विरोधात आज (06 नोव्हेंबर) NRUM या रेल्वे संघटनेने संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (CSMT) आदोलन केलं. त्यामुळे मध्य रेल्वेसह हार्बरवरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. महत्त्वाचे म्हणजे तासभराच्या आंदोनलानंतर दोन्ही मार्गावरील लोकल वाहतूक सुरू झाली, मात्र याचदरम्यान, मस्जीद बंदर ते सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या मधोमध रेल्वे रुळावरून चालणाऱ्या 4 प्रवाशांना लोकलने धडक दिली. या अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एका प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






Comments are closed.