शेफने बनवला प्रेशर कुकरमध्ये चहा, वाचा 2 शिट्ट्यांमध्ये कसा बनवायचा फक्कड चहा
चहाला वेळ नसते पण, वेळेला चहा हा हवाच. चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय. त्यामुळे भारतीयांच्या सकाळची सुरूवातच चहाने होते. चहा प्यायल्याने उबदारपणा, रिफ्रेशिंग वाटते. उन्हाळा असो वा हिवाळा, चहा प्रेमींना प्रत्येक ऋतूत चहा हवाच असतो. चहा विविध पद्धतीने बनवला जातो. ब्लॅक टी, ग्रीन टी, मिल्क टी, हर्बल टी असे चहाचे अनेक प्रकार. चहाच्या प्रकारानुसार त्याची चव बदलते. पण सध्या मात्र चहा बनवण्याची एक भन्नाट ट्रिक व्हायरल होतेय. साधरणपणे चहा करण्यासाठी आपण पातेले वापरतो. पण, शेफ यमन अग्रवाल यांची प्रेशर कुकरमध्ये चहा बनवण्याची युक्ती चांगलीच चर्चेत आहे.
अलिकडेच सोशल मीडियावर कुकींग, शुकिंग नावाच्या एका पेजवर ही रेसिपी शेअर करण्यात आली आहे. चहा बनवण्याच्या या अनोख्या पद्धतीमुळे या चहाची सर्वत्र चर्चा आहे. या रेसिपीची खासियत म्हणजे चहा प्रेशर कुकरमध्ये करण्यात आला आहे. ज्याची चव आणि टेक्सर दोन्ही वेगळे आहेत. यमन अग्रवाल नावाच्या शेफचे हे पेज आहे. पाहूयात कसा बनवायचा कुकरमध्ये चहा.
हेही वाचा – गोव्यात स्वस्त दारू मिळण्याचं नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
चहा बनवण्याची पद्धत –
साहित्य –
- पाणी – 1/2 कप
- आल्याचा छोटा तुकडा
- दूध – दीड कप
- साखर – 3 चमचे
- चहा पावडर – 1 1/2 चमचे
कृती –
- प्रेशर कुकरमध्ये पाणी टाकून सर्व साहित्य एकत्र टाकायचे आहे.
- त्यानंतर कुकरच्या दोन् शिट्या करून घ्यायच्या आहेत.
- कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर कुकरचे झाकण उघडावे.
- त्यानंतर चहा गाळून सर्व्ह करा.
शेफ यमनने या व्हिडीओत असे सांगितले आहे की, कुकरमध्ये बनवलेला चहा चवीला जास्त चांगला असतो. कुकरमध्ये चहा बनवल्याने तो प्रेशरवर बनतो आणि त्याला दम फ्लेवर येतो. याशिवाय कुकरमध्ये जास्त वेळ लागत नाही.
हेही वाचा – राजकारणी, सेलिब्रिटींच्या स्वागतासाठी रेड कार्पेटच का निळा, हिरवा, पिवळ्या रंगाचा का नसतो?
Comments are closed.