Dark Neck Remedies: मानेवरचा काळेपणा घालवण्यासाठी करा हे प्रभावी घरगुती उपाय
बऱ्याचदा असं होतं की चेहरा, हात आणि पायाची काळजी घेताना मानेकडे आपण दुर्लक्ष करतो. परिणामी मानेवर हळूहळू काळेपणा दिसू लागतो. बाजारात यासाठी वेगवेगळी उत्पादनं मिळतात. पण तुम्ही काही घरगुती उपाय करून मानेवरचा काळेपणा घालवू शकता. अगदी घरी असलेले घटक वापरून तुम्ही हे प्रभावी उपाय करू शकता. ( Home Remedies For Dark Neck )
यासाठी तुम्हाला अर्धा लिंबू, हळद, कॉफी पावडर, नारळ तेल आणि शॅम्पू लागेल. अर्ध्या कापलेल्या लिंबावर थोडी हळद, कॉफी पावडर, खोबरेल तेल आणि शाम्पू लावा. नंतर हा लिंबू तुमच्या मानेवर ५ ते ७ मिनिटे हलक्या हाताने घासून घ्या. यामुळे तुमच्या मानेवरील सर्व घाण निघून जाते. लिंबू, हळद, कॉफी पावडर, खोबरेल तेल आणि शाम्पूचे मिश्रण त्वचा स्वच्छ करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे मानेवरील मृत पेशी निघून जातात आणि खोबरेल तेलामुळे त्वचा हायड्रेट राहते.
हे उपाय ही ठरतात प्रभावी
मानेवरचा काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही एका स्क्रबचाही वापर करू शकता. यासाठी ओट्सची जाडसर पावडर गुलाब पाण्यात मिसळून घ्या. ही पेस्ट तुमच्या मानेवर स्क्रबप्रमाणे घासा. यामुळे सर्व घाण निघून जाईल आणि काळे डाग हळूहळू कमी होतील.
तसेच मानेवरील काळेपणा दूर करण्यासाठी दह्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळा. आता ही पेस्ट मानेवर लावा. यामुळे काळे डाग कमी होतात.
Comments are closed.