रात्री एकटं झोपायला आवडतं? पण ते आरोग्यासाठी कितपत योग्य? तज्ञांनी केलं स्पष्ट

बऱ्याचदा प्रत्येकाच्या रात्री झोपण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काहींना एकटं झोपायला आवडतं तर काहींना एकटं झोप लागत नाही. तुम्हाला जर रात्री एकटं झोपायला आवडत आले तर काही गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. संशोधनात असं समोर आलं आहे की एकटं झोपल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते, मानसीक आरोग्यही चांगलं राहते. मात्र त्याचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. त्यामुळे एकटं झोपणं हे आरोग्यासाठी चांगलं की वाईट? हे जाणून घेऊया…

तज्ज्ञांच्या मते, एकटं झोपण्याचे आरोग्यावर वेगवेगळे परिणाम होत असतात. जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर तुमच्यासाठी एकटं झोपणं फायदेशीर ठरतं. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते. मात्र जर तुम्ही चिंता, नैराश्यने ग्रस्त असाल तर तुमच्यासाठी एकटं झोपणं घातक ठरू शकतं. यामुळे अधिकच एकटेपणा जाणवतो. याशिवाय तुम्ही कोणासोबत आणि कसे झोपता यावरही तुमच्या झोपेची गुणवत्ता अवलंबून असते.

एकटं झोपण्याचे फायदे

गाढ आणि आरामदायी झोप
एकटं झोपल्याने दुसऱ्यांमुळे तुमची झोपमोड होत नाही. संशोधनातून असे दिसून आले आहे की एकटे झोपणाऱ्यांना चांगली झोप लागण्यास मदत होते.

मानसिक शांती
जेव्हा तुम्ही एकटे झोपता तेव्हा तुमचे मन अधिक स्थिर राहते. यामुळे मेंदूला आराम मिळतो. सकाळी उठल्यावर अधिक ताजेतवाने, उत्साही वाटते.

तापमान
कधीकधी इतरांसोबत झोपल्याने शरीराचे तापमान वाढते, ज्यामुळे घाम येतो किंवा अस्वस्थ वाटते. एकटे झोपल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

झोपेचा दिनक्रम
एकटं झोपणाऱ्यांचे झोपेचे चक्र आणि जैविक घड्याळ अधिक स्थिर रहते. यामुळे हृदयाचे आरोग्य, पचनक्रिया आणि त्वचेची गुणवत्ता सुधारते.

एकटं झोपण्याचे दुष्परिणाम

मानसिक आरोग्यावर परिणाम
एकटं झोपल्याने चिंता, नैराश्य वाढते. त्याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

सुरक्षिततेची भावना
बऱ्याचदा अनेकांना जोडीदारासोबत किंवा कुटुंबासोबत झोपल्याने सुरक्षिततेची भावना जाणवते. याउलट एकटं झोपल्याने भीती किंवा असुरक्षितता वाढते.

गंभीर आजारांचा धोका
एकटं झोपल्याने अनेकदा तुम्हाला एकटेपणाची भावना जाणवू शकते. यामुळे नैराश्य, चिंता, हृदयरोग आणि उच्च रक्तदाबसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता असते.

Comments are closed.