Beauty Tips: लग्नापूर्वी नॅचरल ग्लो हवाय? हे ५ घरगुती उटणे त्वचेला बनवतील चमकदार
लग्नाच्या दिवशी सर्वात सुंदर दिसावं असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. नवरीसाठी आजकाल पार्लरमध्ये विविध प्रकारचे फेशियल असतात. पण ते अत्यंत महागडे असतात शिवाय त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमुळे कधी कधी त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते. मग जर तुम्हाला अगदी नैसर्गिक घरगुती उपाय करून त्वचा चमकदार बनवायची असेल तर काही नैसर्गिक उटणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. घरगुती घटक वापरून तुम्ही तुमच्या त्वचेची निगा राखल्यास तुम्हाला पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंटशिवाय ग्लो मिळेल. ( Homemade Face Packs For natural glow for brides )
घरात सहज उपलब्ध असलेले हळद, बेसन, चंदन, दूध, बदाम यांसारख्या घटकांपासून तयार केलेलं उटणे हे त्वचेची खोलवर स्वच्छता करतात आणि त्वचा चमकदार बनवतात. लग्नाच्या १ महिना आधीपासून तुम्ही हे उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवतो.
हळद आणि चंदन
हळदीचे दाहक-विरोधी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचा उजळण्यासाठी फायदेशीर ठरतात. चंदनाच्या पावडरमध्ये हळद मिसळून चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
मूग डाळ आणि बेसन
मूग डाळीचे पीठ आणि बेसनाचे मिश्रण त्वचेला आतून पोषण देते. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी आणि सी असते, ज्यामुळे त्वचा उजळते. मूग डाळीचं पीठ आणि बेसनाची पेस्ट चेहऱ्यावर लावून चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यात थोडं कच्चं दूध घातल्यास आणखी फायदा होतो.
बदाम आणि दुध
बदामामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळते ज्यामुळे त्वचा ताजी दिसते. याशिवाय चेहऱ्यावरील मुरमे कमी करण्यासाठी बदाम फायदेशीर आहे. बदाम काही तास दुधात भिजवा नंतर बदामाची सालं काढून मिश्रणाची पेस्ट करून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग निघून जाते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
कडुलिंब आणि कोरफड
कडुलिंबाच्या पानांचा वापर मुरमे कमी करण्यासाठी केला जातो. त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते. ताज्या कडुलिंबाच्या पानांची पावडर बनवा त्यात कोरफडीचे जेल मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.
Comments are closed.