Winter Styling Tips: थंडीत स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ट्रेंडिंग आऊटफिट्स
हिवाळ्याच्या दिवसांत आऊटफिट निवडणं कठीण जातं. कारण थंडीमुळे फार स्टायलिश कपडे घालता येत नाहीत. त्या दिवसांत थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे घालणं गरजेचं असतं. अशा वेळी काही ट्रेंडिंग आऊटफिट्स तुम्ही यंदाच्या थंडीत नक्कीच ट्राय करू शकता. यामुळे तुमचा लूक स्टायलिश दिसेल आणि थंडीपासूनही तुमचा बचाव होईल. ( Trending Woolen Outfits for Winter )
सैल स्वेटर आणि हूडीज
हिवाळ्यात तुम्ही सैल स्वेटर आणि हूडीज ट्राय करू शकता. यामध्ये तुम्ही ट्रेंडी प्रिंटेड स्वेटर आणि हुडीज निवडू शकता. जीन्स आणि लॉन्ग बूटसह हे हुडीज आणि स्वेटर क्लासी लूक देतात.
लांब कोट
थंडीच्या दिवसात तुम्ही लांब कोट ड्रेस घालू शकता. यामुळे स्टायलिश लूक येतो. क्रीम, काळा किंवा आयव्हरी रंगाचे कोट चांगले दिसतात. पार्टी आणि ऑफिससाठी हा लूक परिपूर्ण ठरतो.
लेदर जॅकेट आणि स्कर्ट
लेदर जॅकेट हे कधीही आऊट ऑफ फॅशन नसते. लेदर जॅकेटसह तुम्ही स्कर्ट स्टाईल करू शकता. उबदार फॅब्रिक किंवा लेदरपासून बनवलेले स्कर्ट हिवाळ्यात फॅशनेबल लूक देतात. जीन्स आणि फ्लॅट चप्पल तुम्ही घातल्यास क्लासी लूक येतो.
शैली टिपा
स्टायलिश लूक मिळवण्यासाठी फक्त आऊटफिटच नाही तर अॅक्सेसरीज, हेअरस्टाईल आणि मेकअप देखील महत्त्वाचे आहेत. आउटफिटनुसार नॉर्मल किंवा बोल्ड मेकअप करू शकता. तसेच हाय हिल्स, लॉन्ग बूट, फ्लॅट चप्पल घाला. हिवाळ्यात तुमच्या वॉर्डरोबमध्ये सैल स्वेटर, लांब कोट, लेदर जॅकेट आणि स्कर्ट यासारखे आऊटफिट असणं गरजेचं आहे.
Comments are closed.