Wedding Hall : लग्नासाठी हॉल निवडताना काय लक्षात घ्याल?
तुळशीच्या लग्नानंतर सर्वत्र लगीनघाई दिसते. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. लग्नातील सुंदर क्षण कायम लक्षात राहावे यासाठी काही महिने आधीच तयारी सुरू केली जाते. नवरा-नवरीच्या खरेदीपासून ते लग्नाच्या हॉलच्या सजावटीपर्यंत बारकाईने लक्ष दिले जाते. हल्ली डेस्टिनेशन वेडिंगचे वेड सर्वांमध्ये दिसून येते. पण काही क्षुल्लक चुकांमुळे हे आयोजन बिघडते, ज्याचा नंतर पश्चाताप होतो. अशा परिस्थितीत आपल्या बजेटमध्ये बसणारा आणि लग्नासाठी उत्तम असा हॉल निवडताना काय लक्षात घ्यावे, हे पाहूयात.
ठिकाण –
हॉटेल किंवा हॉलची निवड करताना तुम्हाला सोयीचे जाईल आणि नातेवाईकांना पोहचण्यासाठी सोपे असेल अशा हॉलची निवड करावी. तुम्ही डेस्टिनेशन वेडींग करत असाल आणि लग्नात लहान मुले, वृद्ध येणार असतील तर उंच ठिकाणी, हवामानात वारंवार बदल होणाऱ्या ठिकाणी लग्न करणं महागात पडू शकते. त्यामुळे ठिकाण निवडताना या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी.
खाण्यापिण्याची सोय –
हॉटेल किंवा हॉल निवडताना असा हॉल पाहावा जेथे पाहूण्यांची उत्तम सोय होईल. हॉल कॅटरस असेल तर नाश्ता आणि जेवणाची चव चाखावी. चव चाखताना फूडची गुणवत्ता देखील पाहा.
हेही वाचा – Beauty Tips: लग्नापूर्वी नॅचरल ग्लो हवाय? हे ५ घरगुती उटणे त्वचेला बनवतील चमकदार
हॉटेल –
तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करत असाल तर हॉटेल बूक करताना पाहूणे किती येणार याचा अंदाज बांधून रूम बूक कराव्यात. कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी एखादी रूम एक्स्ट्रा बूक करू शकता.
बजेट –
प्रत्येकाचे बजेट वेगवेगळे असते. त्यामुळे हॉल बुक करताना तुमचं बजेट नक्की तपासा. हॉटेल बुक करत असाल तर खोल्या, डेकोरेशन यांचा शुल्क नक्की तपासावा.
हॉलचा रिव्हू –
हल्ली ऑनलाइन रिव्हू प्रत्येक गोष्टीचा मिळतो. त्यामुळे हॉल बुकिंग करताना रिव्हू वाचावा. तसेच प्रत्यक्ष भेट द्यावी.
हेही वाचा – Bridal Lehenga : ब्रायडल लेहेंगा खरेदी करताना या गोष्टी लक्षात घ्या, होणार नाही पश्चाताप
Comments are closed.