Navale Bridge Accident : नवले पुलावरील आजपर्यंतचा सर्वात भीषण अपघात, फोटो पाहून उडेल थरकाप
पुणे : जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या कात्रजजवळील नवले पुलावर आज गुरुवारी (ता. 13 नोव्हेंबर) संध्याकाळी 5 ते 5.30 वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात एका ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने तब्बल 15 ते 20 वाहनांना धडक दिली. तर एका दुसऱ्या ट्रकला धडक दिली असताना कंटेनर आणि ट्रकच्यामध्ये एक कार आली आणि अशा तिन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये एका वाहनाचा स्फोट झाला आणि तिन्ही वाहनांनी पेट घेतला. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा अपघात भीषण तेव्हा वाटला, जेव्हा या अपघातात 7 जणांनी आपला जीव गमावला. तर 20 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली असून जवळपास दोन किमी अंतरापासून कंटेनर समोर येईल त्या वाहनांना धडक देत पुढे जात होता.
ज्या कंटेनरने वाहनांना धडक दिली, तो राजस्थान पासिंगचा होता. या वाहनाने तब्बल 15 ते 20 वाहनांना धडक दिली. ज्यामध्ये अनेक लहान मोठ्या वाहनांचा समावेश आहे.
या घटनेमध्ये एकूण 7 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे.
घटनेमध्ये कंटेनर आणि ट्रकच्यामध्ये एक चारचाकी वाहन अडकले, ज्याने पेट घेतला आणि त्यानंतर तिन्ही वाहनांनी पेट घेतला.
नवले पुलावर हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरने समोर येईल त्या वाहनाला धडक दिली. यामध्ये एक मिनी व्हॅनचा चुराडा झाला आहे.
या अपघात स्थळावर अनेक वाहने पलटी सुद्धा झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. तर, एका कंपनीच्या बसला सुद्धा या कंटेनरने धडक दिली, ज्यानंतर ते वाहन पलटी झाले. ज्यामध्ये कंपनीची 15 ते 20 लोक होती.
ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने एक मारुती सुझुकी डिझायर कारला जोराची धडक दिली. ज्यामध्ये या कारचा चक्काचूर झाला आहे.
नवले पुलावर हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरने समोर येईल त्या वाहनाला धडक दिली. यामध्ये एक मिनी व्हॅनचा चुराडा झाला आहे.
ज्या ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने वाहनांना धडक दिली, तो कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली.
भरधाव कंटेनरने वाहनांना धडक देत पुढे गेला. त्यानंतर एका कंटेनरला जाऊन धडकला. यावेळी दोन्ही कंटेरनमध्ये एक कार सापडली. या कारमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एक लहान बाळ होते, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या अपघातामुळे नवले पुलावरील अपघाताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर सातत्याने या पुलावर भीषण अपघात होत असल्याने प्रशासनाने याबाबत लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.










Comments are closed.