Utpanna Ekadashi 2025 : उत्पत्ती एकादशी तिथी, पूजा विधी याविषयी संपूर्ण माहिती

हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे. यंदा उत्पत्ती एकादशीचे व्रत 15 नोव्हेंबर (आज) रोजी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, उत्पत्ती एकादशीचे व्रत आरोग्य, संतान सुख आणि मोक्षासाठी शुभ सांगितले जाते. या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास केल्याने अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असे देखील म्हणतात. जाणून घेऊयात तिथी, महत्त्व आणि पूजा विधी.

तारीख

उत्पत्ती एकादशीची तिथी 15 नोव्हेंबर रोजी 12 वाजून 49 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2 वाजून 37 मिनिटांवी हे व्रत समाप्त होणार आहे.

शुभ योग

पंचागानुसार यंदाची उत्पत्ती एकादशी फार खास मानली जाणार आहे. कारण या दिवशी अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. आज उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, विष्कुंभ योग आणि अभिजीत मूहूर्ताचा शुभ संयोग जुळून येणार आहे.

हेही वाचा – मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी? वाचा संपूर्ण माहिती

उपासना पद्धती –

  • उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • घराची साफसफाई करावी.
  • देवाची पूजा करावी.
  • देवासमोर तुपाचा दिवा लावावा.
  • भगवान विष्णूंना तुलसीचे पंचामृत अर्पण करावे.
  • त्यानंतर सूर्यास्तानंतर श्रीहरी भोग चढवावा.
  • भोग चढवतावा विष्णू सहस्त्रनाम तसेच श्रीहरि स्त्रोताचे पठण करावे.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याच्या तथ्यांबद्दल ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ कुठलाही दावा करीत नाही.)

हेही वाचा – आई वडील नसतील तर मुलीचे कन्यादान कोणी करावे?

Comments are closed.