Investment Idea: SIP, म्युच्युअल फंड की FD तरुणांसाठी कोणती गुंतवणूक बेस्ट?

आजची तरुण पिढी केवळ बचत न करता पैसे कुठे गुंतवले तर जास्त वाढतील, याचा शोध घेत आहे. पण इतके पर्याय हातात असल्यामुळे कोणत्या साधनात गुंतवणूक करावी, हे ठरवताना गोंधळ निर्माण होतो. SIP, म्युच्युअल फंड आणि FD हे सर्वच पर्याय लोकप्रिय आहेत. मात्र कोणासाठी कोणता पर्याय योग्य, हे वय, उद्दिष्ट आणि जोखीम घेण्याची क्षमता यावर अवलंबून असते. (sip mutual fund vs fd for young investors best investment options risk management)

गुंतवणुकीचे मुख्य पर्याय

1) SIP/म्युच्युअल फंड
इक्विटी, डेट किंवा हायब्रिड फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते. प्रॉफिट साधारण 10 ते 15 टक्के किंवा काही वेळा अधिकही मिळू शकतो. जोखीम फंडानुसार बदलते.

2) FD (निश्चित ठेव)
बँकेत निश्चित कालावधीसाठी ठेवलेली रक्कम. प्रॉफिट निश्चित परंतु कमी म्हणजेच साधारण 5 ते 7 टक्के. रिस्क जवळजवळ नाही.

3) SIP म्हणजे काय?
म्युच्युअल फंडात दर महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवण्याची पद्धत. सुरुवात फक्त 500 रुपयांपासून करता येते.
तरुण पिढीसाठी योग्य पर्याय कोणता?

तरुणांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय पर्याय म्हणजे SIP मार्फत म्युच्युअल फंडात गुंतवणूक. यामागची कारणे सोपी आहेत.

1) मोठा कालावधी उपलब्ध असल्याने फायदा जास्त. 20 ते 30 वर्षे गुंतवणुकीचा कालावधी असतो, त्यामुळे चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा मिळतो. उदाहरणार्थ, महिन्याला फक्त 2,000 रुपये SIP मध्ये टाकले आणि सरासरी 15% प्रॉफिट मिळाला, तर 25 वर्षांत जवळपास ८० लाखांची गुंतवणूक तयार होऊ शकते.

2) आर्थिक शिस्त तयार होते दर महिन्याला रक्कम बाजूला काढल्याने खर्चाचे नियोजन होते.

3) FD कुठे उपयोगी?

पूण्र सुरक्षितता हवी असेल, आपत्कालीन निधी ठेवायचा असेल किंवा 6-12 महिन्यांचे खर्च बाजूला काढायचे असतील तर FD उत्तम.
घर खरेदी, लग्न, परदेशी शिक्षण अशा निश्चित कालावधीच्या गरजांसाठी FD उपयोगी ठरते.

जोखीम कशी मॅनेज करावी?

– विविध साधनांत गुंतवणूक सर्व पैसे एका ठिकाणी गुंतवू नका. इक्विटी, डेट, सोने आणि रिअल इस्टेटमध्ये थोडे-थोडे विभाजन करा.

– नियमित तपासणी करा
दर 6 ते 12 महिन्यांनी आपली गुंतवणूक तपासा. एखादा फंड सातत्याने खराब कामगिरी करत असेल, तर बदलाचा विचार करा.

तरुण पिढीने दीर्घकालीन आर्थिक स्वातंत्र्यासाठी SIP हा सर्वोत्तम पर्याय मानावा. त्यामुळे 6-12 महिन्यांचा आपत्कालीन निधी FD मध्ये ठेवा. उरलेली रक्कम SIP मार्फत चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंडांत गुंतवा. बाजारातील चढ-उतारांना घाबरू नका. दीर्घकाळ चिकाटी ठेवल्यास मोठा परतावा मिळू शकतो.

Comments are closed.