Natural Lipstick: गुलाबी आणि निरोगी ओठ हवेत? खोबरेल तेलात हे घटक टाकून बनवा नैसर्गिक लिपस्टिक

महिलांचा मेकअप हा लिपस्टिक लावल्याशिवाय पूर्ण होत नाही. तसेच लिपस्टिक लावल्याने चेहऱ्याचं सौंदर्य अजून खुलून दिसते. बाजारात लिपस्टिकचे विविध शेड्स आणिप्रकर उपलब्ध असतात. मात्र बाजारातील हे लिपस्टिक काही प्रमाणात महाग असतात आणि त्यात हानिकारक रसायनं असण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्ही घरी असलेले खोबरेल तेल आणि काही मोजके घटक वापरून तुम्ही घरीच नैसर्गिक लिपस्टिक तयार करू शकता. ( Natural Homemade Lipstick For Pink And Healthy Lips )

हे बनवण्यासाठी तुम्हाला खोबरेल तेल, बीटरूट आणि व्हॅसलीन किंवा शिया बटर लागेल. हे तिन्ही घटक त्वचेसाठी फायदेशीर असतात. यामुळे तुमचे ओठ गुलाबी आणि निरोगी राहतात. तसेच कोणत्याही प्रकारे ओठांचं नुकसान होत नाही.

असे तयार करा नैसर्गिक लिपस्टिक:

  • सर्वात आधी बीटरूट स्वच्छ धुवून त्याचे काप करून पाण्यात शिजवून घ्या.
  • त्यानंतर काप थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर पेस्ट करून घ्या.
  • आता लिपस्टिक बेस तयार करण्यासाठी १ चमचा खोबरेल तेल आणि १/२ चमचा व्हॅसलीन किंवा शिया बटर डबल बॉयलरमध्ये घालून वितळून घ्या.
  • यासाठी तुम्ही गरम पाण्यात एक भांड ठेवून त्यातही हे वितळून घेऊ शकता.
  • आता हे मिश्रण दुसऱ्या एका भांड्यात घेऊन त्यात बीटरूट पेस्ट घाला.
  • बीटरूट पेस्ट बेसमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्या.
  • तयार मिश्रण एका लहान कंटेनरमध्ये घालून रात्रभर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
  • तुमची लिपस्टिक दुसऱ्या दिवशी तयार होईल. तुम्ही ते दररोज वापरू शकता.
  • यामुळे तुमचे ओठ गुलाबी, मऊ आणि चमकदार राहतील.

Comments are closed.