Velvet Suits For Wedding Season: लग्न समारंभात ट्राय करा हे ट्रेंडिंग व्हेल्वेट सूटचे प्रकार

तुळशी विवाह झाल्यावर सनईचे सुर अर्थात लग्नसराई सुरू होते. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अनेक जोडपी विवाहबंधनात अडकतात. या महिन्यांमध्ये गारवा, आल्हाददायक वातावरण असते. अशा वेळी थंडीपासून बचावासह स्टायलशी लूक देणारे आऊटफिट निवडणं फार गरजेचं असतं. यंदाच्या लग्नसराईसाठी तुम्हीही आऊटफिटच्या शोधात असाल तर सध्या ट्रेंडिंग असलेले व्हेल्वेट सूटचे प्रकार तुम्ही ट्राय करू शकता. थंडीच्या दिवसांत हे सूट उबदार पडतात आणि पारंपरिक लूकही शोभून दिसतो. ( Trending Velvet Suits For Wedding Season )

Veliet Plaszo रोड
प्लाझो सूट हे सध्या ट्रेंडिंग आहेत. त्यातच जर तुम्ही व्हेल्वेट प्लाझो सूट स्टाईल केला तर तुमचा लूक अधिक आकर्षक दिसतो. लग्न समारंभासाठी तुम्ही हिरवा, गुलाबी, जांभळ्या रंगाचा सूट ट्राय करू शकता. या सूटवर नेकलाइन आणि ओढणीवर जरीचे वर्क असते, ज्यामुळे तुम्हाला हेव्ही लूक मिळतो. संगीत, पार्टीसाठीही हा सूट परिपूर्ण लूक देतो. यासह तुम्ही ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आणि सौम्य मेकअप ठेवू शकता.

मखमली अनारकली सुटे
लग्नासाठी तुम्ही व्हेल्वेट अनारकली सूट देखील घालू शकता. हे सूट तुम्हाला एक शाही लूक देतात. हिवाळ्यात हे सूट स्टाईल करून तुम्ही ग्लॅमरस लूक मिळवू शकता. यामध्ये विविध वर्कचे डिझाईन असतात. हे सूट तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने खरेदी करू शकता. यासह कुंदन ज्वेलरी शोभून दिसते.

मखमली पंत उपरे
लग्नात आकर्षक लूकसाठी व्हेल्वेट पँट सूटचा नक्की विचार करा. हे अतिशय आरामदायी असतात आणि सुंदर लूक देतात. यावर तुम्ही सुटच्या रंगानुसार मॅचिंग स्टोन चोकर नेकलेस घालू शकता.

Comments are closed.