Famous Wedding Foods: देशभरात लग्न समारंभासाठी ‘या’ १० पदार्थांना असते सर्वाधिक पसंती
सध्या देशभरात लग्नसराईची धूम पाहायला मिळत आहे. विविध समाजात वेगवेगळ्या पद्धतीने लग् सोहळा पार पडतो. लग्नादरम्यान पाळल्या जाणाऱ्या विधींव्यतिरिक्त, लग्नात पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्येही खूप फरक असतो. प्रत्येकाला त्यांच्या पोशाखांना आणि जेवणाला पारंपारिक स्पर्श द्यायचा असतो. जेणेकरून लग्नात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत उत्तम पद्धतीने करता येईल आणि ते नंतर लग्नाच्या जेवणाचे कौतुक करतील. मात्र तुम्हाला माहित आहे का? भारतात लग्नसमारंभासाठी १० पदार्थ हे अत्यंत लोकप्रिय आहेत. हे पदार्थ हमखास लग्नाच्या मेन्यूमध्ये असतात. ते पदार्थ कोणते जाणून घेऊया… ( Top 10 Famous Foods In India For Wedding Season )
बिर्याणी
बिर्याणी ही अनेकांचं फेव्हरेट फूड आहे. त्यामुळे बिर्याणी ही लग्नाच्या मेन्यूत सर्वाधिक पसंत केली जाणारी डिश आहे. हैदराबादी, लखनऊ बिर्याणी ही दक्षिण भारतीय लग्नांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
बटर चिकन
दिल्ली आणि पंजाबमध्ये बटर चिकनला नेहमीच लग्नाच्या मेन्यूत विशेष स्थान असते. उत्तर भारतीय लग्नांमध्ये ही डिश अतिशय लोकप्रिय आहे आणि लग्नात पाहुणे नान किंवा रोटीसोबत ते खाण्यास पसंत करतात.
पनीर टिक्का
शाकाहारी पाहुण्यांसाठी हे एक उत्तम स्टार्टर आहे. पंजाब आणि दिल्लीतील लग्नांमध्ये ही डिश सामान्य आहे. राजस्थान आणि गुजरातमधील लग्नांमध्येही या डिशला पसंती असते.
मलई कोफ्ता
मलई कोफ्ता हा उत्तर भारतीय लग्नसमारंभातील लोकप्रिय पदार्थ आहे. मुघलाई पाककृतीशी ही डिश संबंधित असून हिवाळ्यात लग्नात ही डिश मेन्यूत लोकप्रिय असते.
तंदुरी चिकन
लग्न म्हंटलं की तंदुरी चिकन ही सर्वांची आवडती डिश ठरते. विशेषतः पंजाब आणि उत्तर भारतीय लग्नांच्या मेन्यूमध्ये या डिशचा समावेश असतो. गोवा आणि महाराष्ट्रातील लग्नांमध्येही तंदुरी चिकन ही डिश असते.
दाल माखणी
दाल मखनी हा भारतातील अनेक भागांमध्ये बनलेला बहु-निर्मित पदार्थ आहे जो भारतात सामान्य पदार्थ बनतो. नाना, तांदुरे रोटी किंवा जेरा रायसोबत खात ही वैर.
रसगुल्ला
लग्नाचा मेन्यू हा गोडाशिवाय अपूर्ण असतो. आता गोडाचा विषय आला तर रसगुल्ला हा लग्नाच्या मेन्यूत सर्वाधिक पसंत केला जाणारा पदार्थ आहे. बंगाल आणि ओडिशामध्ये तर रसगुल्ला हा लग्नाच्या मेन्यूचं प्रमुख आकर्षण असतो. आता उत्तर भारतीय लग्नांमध्येही या पदार्थ पाहुण्यांना वाढला जातो.
गोड पदार्थ
गुलाब जामुन हा महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत लग्नात वाढला जाणारा गोड पदार्थ आहे. हा पदार्थ बनवायला सोपा असतो. आजकाल आइस्क्रीमसह गुलाबजामून सर्व्ह करण्याचा नवा फूड ट्रेंड सुरू झाला आहे.
जिलेबी
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये, लग्नसमारंभाचा मेन्यू हा जिलेबीशिवाय अपूर्ण मानला जातो. तसेच बहुतांश भागांत रबडीसह जिलेबी सर्व्ह केली जाते.
कुल्फी
उत्तर भारतातीलविशेषतः दिल्ली, लखनऊ आणि जयपूरमधील लग्नांमध्ये कुल्फीचे स्टॉल लावले जातात आणि लग्नातील पाहुणे त्याचा आनंदाने आणि चवीने आस्वाद घेतात.
महाराष्ट्रात या पदार्थांना सार्वधिक पसंती
महाराष्ट्रात लग्नात येणारे पाहुणे हे जेवणासाठी अधिक उत्सुक असतात. त्यामुळे लग्नाचा मेन्यू हा फार विचारपूर्वक निवडला जातो. मात्र महाराष्ट्रीय लग्नात पुढील तीन पदार्थांचा समावेश हा असतोच. या पदार्थांशिवाय महाराष्ट्रीयन लग्नाचा मेन्यू हा अपूर्ण मानला जातो. जसे की, भरली वांगी, भरली वांगी ही महाराष्ट्रातील लोकांची आवडती भाजी आहे. भरली वांगी पोळी किंवा पुरी आणि वरण-भातासह खाल्ली जाते. पुरणपोळी हा महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध आणि पारंपरिक पदार्थ आहे. लग्नात आलेल्या पाहुण्यांना हमखास पुरणपोळी वाढली जाते. प्रत्येक लग्नात भात, चपाती आणि पुरी असते. त्यातच महाराष्ट्रीय लग्नाचा अभिमान म्हणजे मसाला भात. इथल्या लग्नांमध्ये ही डिश नक्कीच पाहायला मिळते.
Comments are closed.