Destination Wedding: महाराष्ट्रातील ही ठिकाणं ठरतात डेस्टिनेशन वेडिंगसाठी परफेक्ट

आजकाल विवाहसोहळा हटके करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यासाठी हल्ली शाही फीलिंगसाठी डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन केलं जातं. आता डेस्टिनेशन वेडिंग म्हंटल की महाराष्ट्राच्या बाहेरील ठिकाणांचा विचार केला जातो, मात्र बऱ्याचदा तेवढं बजेट नसते. अशावेळी तुम्ही तुमच्या बजेटमध्ये महाराष्ट्रातील काही ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करू शकता. या ठिकाणी विवाहसोहळा आयोजित करून तुम्हाला एक खास, नयनरम्य आणि अविस्मरणीय असा अनुभव येईल. ती ठिकाणं कोणती ते जाणून घेऊया.. ( Famous Places for Destination Wedding In Maharashtra )

अलिबाग
अलिबाग या ठिकाणाला महाराष्ट्रातील ‘मिनी गोवा’ असं म्हंटल जातं. जर तुमची समुद्रकिनाऱ्यावर लग्न करण्याची इच्छा असेल तर अलिबाग हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. इथे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स सहज मिळतील. हे ठिकाण शांत समुद्रकिनारे, नारळाची झाडे आणि सनसेटच्या सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. ज्यामुळे इथे तुम्हाला बीच वेडिंगचा अनुभव मिळेल.

नाशिकचे वाइनयार्ड
नाशिकला भारताचे ‘वाईन कॅपिटल’ असं म्हंटलं जातं. त्यामुळे जर तुम्ही हटके वेडिंग डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर वाइनयार्ड वेडिंग हा चांगला पर्याय ठरतो. इथले द्राक्षांचे मळे, शांत रिसॉर्ट्समुळे तुम्हाला चांगला अनुभव येतो. तसेच या ठिकाणी सूर्यप्रकाशात फोटोशूट करण्यासाठी सोयीस्कर ठरते.

लोणावळा-खंडाळा
मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरापासून जवळ असल्यामुळे लोणावळा आणि खंडाळा हे सर्वात सोयीचे ठिकाण पडते. इथे निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेत तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करू शकता. या ठिकाणी अनेक आलिशान रिसॉर्ट्स आणि बुटीक हॉटेल्स उपलब्ध आहेत. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात लग्न असल्यास इथलं वातावरण अधिकच खुललेलं असतं.

महाबळेश्वर-पाचगणी
पश्चिम घाटातील ही दोन्ही ठिकाणे पर्वतांवरील शांतता आणि थंडीसाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी पर्यटकांची मांदियाळी असल्यानं अनेक अति-आलिशान रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. थंड हवामान आणि सुंदर व्ह्यू-पॉईंट्समुळे तुमचा विवाहसोहळा खूपच आकर्षक आणि वेगळा ठरू शकतो.

Comments are closed.