Black Apple: जगातील सर्वात महाग काळं सफरचंद; किंमत ऐकून व्हाल थक्क

‘अ‍ॅन अ‍ॅप्पल अ डे कीप्स डॉक्टर अवे’ हे तर प्रत्येकाला माहीतच आहे… सफरचंद हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यामुळेच तज्ञांकडूनही दररोज सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. सफरचंद हे जगातील सर्वात आरोग्यदायी फळ मानले जाते. तुम्ही लाल, हिरव्या रंगाचं सफरचंद बघितलं असेल पण तुम्हाला माहित आहे का? जगात काळ्या रंगाचं देखील सफरचंद असतं. विशेष म्हणजे ते जगातील सर्वात महाग सफरचंद म्हणून ओळखलं जातं. त्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल ! ( World’s Most Expensive Apple )

जगभरात खाल्ल्या जाणार्‍या लोकप्रिय फळांबाबत विचार केला तर सफरचंद या यादीत अग्रस्थानी आहे. सफरचंद अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतं. त्यामुळे डॉक्टर रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. लाल, हिरव्या रंगाचं सफरचंद हे सामान्य आहे, पण काळ्या रंगाचं हे सफरचंद ‘ब्लॅक डायमंड अ‍ॅप्पल’ म्हणून ओळखलं जातं. तिबेटच्या काही भागांतच आढळणारं हे सफरचंद दुर्मिळ मानलं जातं. या सफरचंदाची किंमत ५०० रूपये प्रति नगपासून सुरू होते.

सफरचंद काळे का असते? (ब्लॅक डायमंड ऍपल)
या सफरचंदाला तिबेटी स्थानिक भाषेत ‘निउ’ असेही म्हणतात. तिबेट उंच पर्वतांवर वसलेले आहे, त्यामुळे सूर्याची किरणे थेट फळे आणि पिकांवर पडतात. सूर्यप्रकाशाच्या किरणांमुळे हे सफरचंद काळे होतात. सफरचंदाचा आतील भाग मात्र पांढरा राहतो. तर काही परिस्थितीत याचा रंग जांभळाही असतो. सामान्यपणे लाल सफरचंदाची झाडं ही ४-५ वर्षांत फळं देतात. मात्र काळं सफरचंद हे ८ वर्षे किंवा त्याहून जास्त काळाने केवळ 2 महिने येते. लाल सफरचंदाची झाडे दरवर्षी ८०% उत्पादन देतात, तर काळी सफरचंदाची झाडे केवळ ३०% उत्पादन देतात. त्यामुळे काळं सफरचंद हे दुर्मिळ ठरतं. तिबेटमधील स्थानिकांनाही हे फळ मुबलक प्रमाणात मिळत नाही.

हे सफरचंद लाल सफरचंदांपेक्षा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. ब्लॅक डायमंड अ‍ॅप्पल हे फायबरचा समृद्ध स्रोत आहे, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांना फायदा होतो. याव्यतिरिक्त त्यात आवश्यक जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते आणि त्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास फायदेशीर असतात. मात्र दुर्मिळ असल्यानं अनेकदा हे फळ एक लक्झरी लाईफस्टाईलचा भाग मानलं जातं.

Comments are closed.