या देशांमध्ये घरात पाळले जातात सिंह आणि बिबट्या; पण भारतात कडक बंदी का?
सामान्यतः पाळीव प्राणी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कुत्रा, मांजर किंवा पक्षी यांचीच कल्पना येते. पण जगात असेही काही देश आहेत जिथे लोक सिंह, चित्ता आणि बिबट्या यांसारखे धोकादायक वन्य प्राणीही घरात पाळतात. हे ऐकायला जरी अविश्वसनीय वाटत असलं तरी अमेरिका आणि युएईसारख्या देशांत हे काही नवीन नाही. मात्र भारतासह अनेक देशांमध्ये यावर पूर्ण बंदी आहे. (countries where lions and leopards are kept as pets)
अमेरिकेत वन्य प्राण्यांना पाळण्याबाबतचे कायदे राज्यानुसार वेगळे आहेत. अनेक राज्यांत नियम खूपच हलके असल्याने लोक सिंह, चित्ता, कोल्हे आणि इतर वन्य प्रजाती घरात पाळतात. अंदाजानुसार सुमारे १२ राज्यांमध्ये लोकांच्या घरात ५,००० हून अधिक चित्ते ठेवले जातात. आश्चर्य म्हणजे, जंगलात चित्त्यांची संख्या यापेक्षा खूपच कमी आहे. कायदे कडक नसल्यामुळे या प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणून ठेवण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे.
युएईमध्येही काही वर्षांपूर्वी सिंह किंवा बिबट्या पाळणे हे श्रीमंतीचं प्रतीक मानलं जायचं. सोशल मीडियावर महागड्या कारसोबत सिंह किंवा चित्ते घेऊन फिरणारे व्हिडिओ आणि फोटो नेहमीच व्हायरल होत असत. मात्र २०१७ नंतर युएईने कठोर कायदे लागू केले. आता अशा प्राण्यांना घरात ठेवल्यास मोठा दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो. सिंह-बिबट्यांना फक्त प्राणीसंग्रहालय किंवा संशोधन केंद्रांमध्येच ठेवण्याची परवानगी आहे.
पाकिस्तानमध्येही काही नामांकित कुटुंबे आणि राजकारणी सिंह व बिबट्या पाळत असल्याचं दिसत असे. पण आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षण नियम कडक झाल्यानंतर, बहुतेक वन्य प्राणी प्राणीसंग्रहालयात हलवण्यात आले.
भारतामध्ये मात्र नियम अत्यंत स्पष्ट आहेत. देशात कोणताही वन्य प्राणी सिंह, वाघ, बिबट्या किंवा चित्ता खाजगीरित्या पाळणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार असे प्राणी ठेवताना आढळल्यास कठोर कारवाई, दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो. यामागचं मुख्य कारण म्हणजे प्राण्यांचं संरक्षण, त्यांचं नैसर्गिक अधिवासाचं रक्षण आणि माणसांच्या सुरक्षिततेचा विचार.
वन्य प्राणी नैसर्गिक जंगलात राहण्यासाठीच बनलेले असतात. त्यांना घरात पाळणं हे त्यांच्या आरोग्यासाठी, स्वभावासाठी आणि जीवनासाठी धोकादायक ठरू शकतं. काही देशांमध्ये नियम शिथिल असल्याने हे प्राणी पाळले जात असले, तरी भारतासारखे देश संवर्धन आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देतात.
अस्वीकरण: या लेखातील माहिती सामान्य स्रोतांवर आधारित आहे.ही. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची पुष्टी करत नाही.
Comments are closed.