हिवाळ्यात वरदान ठरतो ‘हा’ हर्बल चहा; मसाल्याचा घटक वापरून बनवतात; जाणून घ्या फायदे

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे सतत काही तरी गरम खाण्याची आणि पिण्याची इच्छा होते. अशा वेळी तुम्ही आरोग्यदायी असा स्टार अ‍ॅनिस टी घेऊ शकता. मसाल्याचा घटक असलेला चक्रफूल वापरून हा चहा बनवला जातो. विशेष म्हणजे तो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे प्राचीन काळापासून आशियाई हर्बल औषधांमध्ये चक्रफुलाचा वापर केला जातो. ( Star Anis Herbal Tea Benefits in Winter )

चक्रफुलाचा चहा आजकाल प्रचंड ट्रेंडिंग आहे. हा मसाल्याचा घटक चीन आणि व्हिएतनाममधील झाडाच्या वाळलेल्या फळांपासून बनवला जातो. त्याची चव आणि सुगंध दोन्हीही अप्रतिम असतात. यामध्ये आढळणारे शिकिमिक अ‍ॅसिड हे अँटीव्हायरल औषधांमध्ये वापरले जाते. त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे सध्या हा चहा नवा हेल्थ ट्रेंड म्हणून समोर येत आहे.

कसा बनवायचा? (स्टार अनिस हर्बल टी कसा बनवायचा)
घरी हा चहा बनवणे खूप सोपे आहे. यासाठी एक चक्रफुल घ्या आणि एक कप उकळत्या पाण्यात ते टाका. सुमारे ५ ते ७ मिनिटे हे पाणी उकळू द्या. नंतर चहा एका कपमध्ये गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात थोडे मध, आले किंवा दालचिनीचा तुकडा घालू शकता यामुळे त्याची चव आणखीनच वाढते. हा चहा पूर्णपणे कॅफिनमुक्त असल्याने संध्याकाळी किंवा जेवणानंतर पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शारीरिकसह मानसिक आरोग्याला फायदा होतो.

असे आहेत आरोग्यदायी फायदे
हा चहा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. गॅस, पोटफुगी आणि अपचनाचा त्रास कमी होतो. तसेच सर्दी, ताप, खोकल्यासारख्या संसर्गाच्या आजारांपासूनही आराम मिळतो. या चहामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, त्यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीराचे थकवा आणि तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

हे वाचा:

महत्त्वाचं म्हणजे स्टार अ‍ॅनिसचे दोन प्रकार असतात चायनीज स्टार अ‍ॅनिस, जो पिण्यास सुरक्षित आहे, आणि जपानी स्टार अ‍ॅनिस, जो विषारी असल्यामुळे त्याचे सेवन करू नये.

नेहमी प्रतिष्ठित दुकानांमधून ते खरेदी करा आणि लेबल नसलेले पॅकेजिंग घेणं टाळा.

जर तुम्ही गर्भवती असाल, स्तनपान करत असाल तर त्याचं सेवन करू नये.

Comments are closed.