हिवाळ्यात सांधेदुखी : ए? काला हे रुतीं अनुसरण करा
थंडीची लाट आता हळूहळू पसरायला लागली आहे. थंडी वाढताच सर्दी-खोकल्यासह Joint Pain अर्थात सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. सुरूवातीला हातपाय आखडल्यासारखे वाटू लागतात. हळूहळू त्रास वाढून गुडघे, कंबर, खांदे आणि जुन्या वेदना पुन्हा दुखू लागतात. काही वेळा या वेदना असह्य होतात ज्यामुळे कोणतेच काम करणे शक्य होत नाही, चालतानाही त्रास होतो. तुम्ही सुद्धा यापैंकी एक असाल तर आज आपण जाणून घेऊयात या दिवसात आरोग्याची काळजी कशी घ्यावी.
सांधेदुखी का वाढते?
हिवाळ्यात सांधेदुखी होणे ही एक सामान्य समस्या आहे. या दिवसात थंडीमुळे नसा आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. शरीरात रक्तप्रवाह कमी झाल्याने गुडघे, कंबर आणि खांद्यामध्ये कडकपणा जाणवू लागतो.
उपाय –
उबदार कपडे –
थंडीत शरीर उबदार ठेवावे. कारण या दिवसात तापमान कमी होते. ज्यामुळे सांध्यांमध्ये कडकपणा वाढतो. तुम्हाला वारंवार सांधेदुखीचा त्रास होत असेल तर जाड थर असलेले कपडे घालावेत. फरशीवर थेट बसू नये. यासाठी ब्लॅँकेट, रजाई घ्यावी. हीटिंग पॅडचा वापर करावा. मोजे, कानटोपी, स्वेटर घालावे.
हेही वाचा – हिवाळ्यात वरदान ठरतो ‘हा’ हर्बल चहा; मसाल्याचा घटक वापरून बनवतात; जाणून घ्या फायदे
व्यायाम –
थंडीत आळस आल्याने बरेचजण व्यायाम करणे टाळतात. पण यामुळे वेदना आणखी वाढू शकतात. जेव्हा शरीराची हालचाल होते तेव्हा रक्तप्रवाह सुधारतो आणि सांध्यातील कडकपणा कमी होतो. त्यामुळे रोज सकाळी न चुकता हलके स्ट्रेचिंग आणि योगा करायला हवा.
सूर्यप्रकाश –
सूर्यप्रकाश कमी असल्याने हिवाळ्यात ‘व्हिटॅमिन D’ कमतरता शरीरात निर्माण होते, जे सांधेदुखीला एक प्रमुख कारण ठरते. त्यामुळे शक्य असल्यास थोडा वेळ दररोज सौम्य सूर्यप्रकाशात बसावे.
बसण्याची स्थिती –
सांधेदुखी बसण्याच्या चुकीच्या स्थितीमुळे ट्रिगर होऊ शकते. त्यामुळे बसताना कुबड न काढता पाठ सरळ ठेवून बसावे, पाठीला आधार द्यावा.
जुनी दुखापतीकडे लक्ष द्या –
ज्यांचे पूर्वी फ्रॅक्चर, लिगामेंट दुखापत किंवा शस्त्रक्रिया झाल्या आहेत त्यांच्यासाठी हिवाळा त्रासदायक असतो. थंड वातावरणामुळे या भागांवर ताण येतो आणि वेदना असह्य होतात. यावर उपाय म्हणून हलक्या स्ट्रेचिंगची सवय करावी.
(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा – Winter Diet: हिवाळ्यातील आहार कसा असावा? वाचा आरोग्यतज्ञांचा सल्ला
Comments are closed.