प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय आणि ती कशी केली जाते?
हिंदू धर्मात पठण आणि उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देव चरांचरात व्यापलेला आहे असे म्हटलं जातं.शास्त्रातही पूजा आणि विविध विधींचे महत्त्व वर्णन केलं आहे. त्यामुळे दिवस उत्तम जावा यासाठी दररोज सकाळी मनोभावे घरातील देवतांची पूजा केली जाते. काही जण तर न चुकता नियमितपणे मंदिरातील देवांची भेट घेण्यासाठी मंदिरात जातात. आपल्या देवघरातही विविध देवतांच्या मूर्ती बसवल्या जातात. मूर्ती बसवताना तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. असे सांगितलं जातं की, एखाद्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याशिवाय तिच्या देवत्व येत नाही. पण, प्राणप्रतिष्ठापना म्हणजे नेमकं काय आणि ती कशी केली जाते जाणून घेऊयात.
प्राणप्रतिष्ठापना –
हिंदू धर्मात मुर्तीची प्राणप्रतिष्ठेला खूप महत्त्व आहे. कोणत्याही मुर्तीची स्थापना करण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा करणे गरजेचे असते. प्राण म्हणजे ‘शक्ती’ आणि प्रतिष्ठा म्हणजे ‘स्थापना’. वास्तविक हा एक विधी आहे. या विधीद्वारे देवतेच्या मूर्तीचा अभिषेक केला जातो. वेद मंत्राच्या पठणात मूर्तीची स्थापना केली जाते. ज्यानंतर मूर्तीला देवत्व प्राप्त होतं, अशी मान्यता आहे.
का महत्त्वाची आहे प्राणप्रतिष्ठा ?
धार्मिक मान्यतेनुसार प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्तीची पूजा करणे शुभ मानलं जात नाही. असं सांगितलं जातं की, प्राणप्रतिष्ठा केल्यानेच मूर्तीत प्राण येतात आणि यानंतरच मूर्तीची पूजा करणे शुभ असतं. जेव्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते तेव्हा मूर्तीत देव विराजमान होतात अशी मान्यता आहे. याशिवाय ही प्राणप्रतिष्ठा शुभ मुहूर्तावर करणे देखील गरजेचे आहे. असं म्हणतात की, प्राणप्रतिष्ठेनंतर देवतेच्या मूर्तीची पूजा केली नाही तर तिची शक्ती कमी होत जाते.
प्राणप्रतिष्ठा करण्याची विधी
- विधीच्या सुरूवातीला मूर्तीला सन्मानाने आणण्यात येतं.
- मनोभावे मूर्तीचं स्वागत केलं जातं.
- यानंतर मूर्तीला दुधाने अंघोळ घातली जाते.
- मूर्ती स्वच्छ केली जाते आणि अभिषेक करण्यायोग्य बनवली जाते.
- यानंतर मूर्तीला गर्भगृहात ठेवून पूजा सुरू होते.
- पूजा करताना मूर्तीचे मुख पूर्वेकडे असते.
- यानंतर मंत्राचे पठन केले जाते.
- विधिवत पंचोपचाराने पूजा केली जाते.
- नंतर आरती करून भाविकांमध्ये प्रसाद वाटला जातो.
(टीप – येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ त्याची हमी देत नाही.)
हेही वाचा – मार्गशीर्ष अमावस्या 19 की 20 नोव्हेंबरला? जाणून घ्या योग्य तारीख
Comments are closed.