Dust Allergy : धुळीची ऍलर्जी घरगुती उपायांनी करा दूर

आपल्यापैंकी अनेकांना धुळीची ऍलर्जी असते. अशा लोकांना जरा धुळीच्या संपर्कात आल्यावर सतत शिंका येतात, श्वास घ्यायला त्रास होतो, डोळे सुजतात, नाकही वाहते. वास्तविक, धुळीच्या कणांमध्ये सूक्ष्मजीव असतात. जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. यासह हवेतील परागकण, प्राण्यांचे केस, बॅक्टेरियांमुळे देखील ऍलर्जी होते. या ऍलर्जीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध असली तरी याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. अशा परिस्थितीत धुळीची ऍलर्जी दूर करण्यासाठी घरगुती उपाय करता येतील. आज आपण जाणून घेऊयात धुळीची ऍलर्जी कमी करणारे घरगुती उपाय.

घरगुती उपाय –

  • आहारात दही, ताक, चीज यांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. ज्यामुळे ऍलर्जीचा त्रास उद्भवत नाही.
  • धुळीची ऍलर्जी टाळण्यासाठी आहारात पपई, लिंबू, संत्रीसारख्या व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई युक्त पदार्थांचा समावेश करावा.

हेही वाचा – मासिक पाळीची तारीख दरमहिन्याला बदलते? करा हे घरगुती उपाय

  • ग्रीन टी सेवन करणे फायद्याचे ठरेल. यातील ऍटीऑक्सिडंट्स शरीरात ऍलर्जीची रिऍक्शन रोखतात. त्यामुळे ग्रीन टी दिवसातून दोन वेळा तुम्ही घेऊ शकता.
  • तुम्ही मधाचे सेवन करू शकता. धुळीमुळे सतत शिंका येत असतील तर दिवसातून दोन वेळा एक लहान चमचा मधाचे सेवन करावे.
  • निलगिरीचे तेल गरम पाण्यात घालून वाफ घेतल्यास धुळीमुळे उद्भवणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच या वाफेमुळे सायनसचे पॅकेज मोकळे होतात.

(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

हेही वाचा – Winter Bath Tips: हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळकरून बाहेर येताच थंडी का वाजते? जाणून घ्या कारणं

Comments are closed.