Bride And Wedding: लग्नाचा अजब नियम, येथे केवळ स्थूल नवरीलाच मागणी
प्रत्येक मुलीला लग्नात सुंदर आणि हटके दिसायचं असतं. त्यामुळे लग्न ठरलं रे ठरलं की प्रत्येक मुलगी घरी तासंतास योगा, जिम किंवा व्यायाम करू लागते. इतकंच काय तर अनेकजणी स्पेशल डायट सुद्धा करतात. दररोज स्किनकेअर, हेअरकेअर करतात. पण, आफ्रिकेतील एके ठिकाणी उलटा नियम आहे. या देशात मुली लग्नाआधी स्वत:चे वजन वाढवतात. कारण येथे स्थूल नवरीलाच मागणी असते. हो तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात.
आफ्रिकन देश मोर्टेनियाच्या मुली वर्षानुवर्षे ही परंपरा जपत आहेत. मोर्टेनिया हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे जिथे ही प्रथा लेबल म्हणून ओळखली जाते. येथे केवळ जाड स्त्रियांना सुंदर म्हटले जाते. मोर्टनियाच्या ग्रामीण भागात लग्नाची ही परंपरा वर्षानुवर्ष पाळली जात आहे. येथील मुलींच्या शरीरावर लटकलेली चरबी त्याचबरोबर पोटावर असणारे स्ट्रेचमार्क हे सौंदर्याचे लक्षण मानले जाते. येथे मुलीचं लग्न ठरलं रे ठरलं की, भरपूर खायला दिलं जातं. यात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचा समावेश असतो. जर एखाद्या मुलीला हे जेवण जेवून त्रास झाला तरी सुद्धा तिला जबरदस्ती खाण्यास भाग पाडलं जातं.
मोर्टेनिया येथील ही प्रथा जरी जुनी असली तरी इथल्या मुली त्या विरोधात सातत्याने आता आवाज उठवत आहेत. खरं तर WHO च्या म्हणण्यानुसार सामान्य स्त्रीने दररोज 2000 कॅलरीज घेणं आवश्यक असतं. पण, या प्रथेमुळे मुलींना 16000 कॅलरीज सक्तीने दिल्या जातात. ज्यामुळे वजन वाढून भविष्यात त्यांना रक्तदाब, हृदय विकार असा समस्या उद्भवण्याचा धोका असतो.
हेही वाचा – Tea : कुठे शेणाचा तर कुठे टोमॅटोचा, वाचा जगातील सर्वात विचित्र चहा
Comments are closed.