Gardening Tips: हिवाळ्यात थंड वातावरणामुळे कोमेजतात झाडं; अशी घ्या काळजी

हिवाळ्यात थंड वातावरण असतं. जसे जास्त सूर्यप्रकाश झाडांसाठी घातक असतो त्याचप्रमाणे जास्त थंडीमुळे झाडं कोमेजून जातात. थंड तापमान, वारा आणि कमी सूर्यप्रकाशामुळे झाडे कोमेजायला लागतात. तसेच या हंगामात जास्त पाणी आणि खत झाडांना हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे थंडीच्या काळात झाडांची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. ( How to take care of plants in winter )

अशी करा देखभाल:

कमी पाणी
तुमच्या रोपांना संतुलित पद्धतीने पाणी देणं गरजेचं आहे. हिवाळ्यात झाडांना कमी पाणी लागते कारण जमिनीत जास्त दिवस ओलावा राहतो. त्यांना दररोज पाणी दिल्यास मुळे कुजतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात झाडांना दररोज पाणी देणे टाळावे. कुंडीतील वरील माती कोरडी झाली की झाडांना पाणी घालावं.

सूर्यप्रकाश
सर्व वनस्पतींना सूर्यप्रकाशाची गरज असते. सूर्यप्रकाशाशिवाय कोणतीही वनस्पती जास्त काळ जगू शकत नाही. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे दिवसा रोपं सूर्यप्रकाश ठेवा. यामुळे ते सहज वाढतात.

स्वच्छता
बऱ्याचदा झाडांच्या पानांवर धूळ जमा होते. हे सूर्यप्रकाश रोखू शकते आणि प्रकाशसंश्लेषण कमी करू शकते. त्यामुळे झाड कमकुवत होते. म्हणून वनस्पतींची पाने स्वच्छ करणे महत्वाचे आहे. तसेच पिवळी पडलेली पानेही काढून टाकावी.

किटकांपासून संरक्षण
हिवाळ्याच्या महिन्यांत घरामध्ये कीटक अधिक सक्रिय असू शकतात. त्यामुळे तुमची झाडे नियमितपणे तपासा, विशेषत: पाने आणि देठांच्या खाली. कीड दिसल्यास कीटकनाशकांची फवारणी करावी.

हे टाळा:

या दिवसांत झाडं कोमेजतात. त्यामुळे त्यांना जास्त पाणी द्यावं असा समज होतो. पण तसं करणं टाळा. या हंगामात झाडांना खताची आवश्यकता नसते, म्हणून त्यांना अनावश्यक खत घालणे टाळा. रोपांची छाटणी करण्यासाठी देखील हा चांगला काळ नाही.

Comments are closed.