Winter Travel: हिवाळ्यात ट्रिप प्लॅन करताय? मग ‘या’ वस्तू पॅक करायला विसरू नका !

हिवाळ्यात सर्वत्र गुलाबी थंडी असते. या दिवसांत अनेक ठिकाणी निसर्गरम्य वातावरण असते. त्यामुळे मित्र मंडळी, कुटुंबासह लांब ट्रिप प्लॅन केली जाते. मात्र थंडीच्या दिवसांत ट्रिपला जाताना काही गोष्टी तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. यामुळे तुमची ट्रिप सुखकर होते. थंडीत प्रवास करण्याचा आनंद वेगळाच असतो, पण थोड्या निष्काळजीपणामुळे त्रास होऊ शकतो. अशावेळी तुमच्या बॅगेत काही गोष्टी पॅक करायला अजिबात विसरू नका ! ( Winter Travel Tips )

उबदार कपडे
जर तुम्ही हिवाळ्यात प्रवास करत असाल तर साहजिकच थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लोकरीचे किंवा थर्मल जॅकेट ठेवा. तसेच चांगल्या दर्जाचे उबदार कपडे तुमच्यासोबत कॅरी करा.

स्कार्फ, मफलर आणि टोप्या
थंडीपासून बचावासाठी अंगभर गरम कपडे घातले तरी नाक, कान उघडे राहिल्याने सर्दी, तापसारख्या आजारांचा धोका असतो. त्यामुळे स्कार्फ, मफलर आणि टोपी सोबत ठेवा. तसेच तुमचे हात उबदार ठेवण्यासाठी हातमोजे, लोकरीचे मोजे ठेवा. याशिवाय पायात घालायला सॉक्स आणि वॉटरप्रूफ शूज देखील महत्त्वाचे आहेत.

स्किनकेअर उत्पादने
हिवाळ्यातील वातावरणाचा त्वचेवर थेट परिणाम होतो. यामुळे त्वचेच्या समस्या वाढतात. त्यामुळे थंडीत ट्रिपला जाताना तुमच्यासोबत काही स्किनकेअर उत्पादने जसे की, मॉइश्चरायझर, लिप बाम, हेअर ऑइल असावं. तसेच थंडीतही सूर्याची किरणे तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात त्यामुळे तुमच्या बॅगेत सनस्क्रीन ठेवा.

गरम पाण्याची बाटली किंवा थर्मॉस
आजकल सगळीकडे सगळं मिळतं पण तरी तुमच्यासोबत छोटा थर्मॉस, पाण्याची बाटली असावी. रात्रीच्या वेळी तुम्हाला गरम पाणी, चहा किंवा कॉफी घेण्यासाठी या वस्तू गरजेच्या ठरतील.

औषधे
थंडीत ताप, सर्दी, खोकला आणि वेदनांसाठी औषधे सोबत ठेवा. तसेच, व्हिटॅमिन सी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे कोरडे पदार्थ पॅक करा. तुम्ही ड्राय फ्रुट, लाडू, फळं सोबत ठेवू शकता.

पोर्टेबल हीटर
जर तुम्ही खूप थंड ठिकाणी प्रवास करत असाल तर हीटिंग पॅड किंवा पोर्टेबल हीटर उपयुक्त ठरू शकते. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर तुम्हाला कमी किमतीत ते मिळू शकतात.

Comments are closed.