Pregnancy Tips : प्रेग्रेन्सीमध्ये नोकरी घर सांभाळताना तारांबळ उडते? या टिप्स करा फॉलो
आई होणे ही जगातील सर्वात सुखद अनुभव देणारी गोष्ट आहे. हे 9 महिने महिलेच्या आयुष्यातील सुंदर काळ असतो. पण, काही वेळा तो कठीण आणि आव्हानात्मक देखील ठरू शकतो. विशेषत: जर तुम्ही नोकरी करणारी महिला असाल तर.. हल्ली बऱ्याच महिला अगदी 7 व्या किंवा 9 व्या महिन्यापर्यंतत नोकरी करतात. अशावेळी आईसह बाळाच्या तब्येतीचा आबाळ होऊ नये आणि घर नोकरीही नीट सांभाळता यावी यासाठी पाहूयात महत्त्वाच्या टिप्स,
आहार –
प्रेग्रेन्सीमध्ये महिलेने सकस आहारावर भर देणे आवश्यक असते. सकस आहारातून बाळाचा विकास होतो त्यामुळे दिवसातून तीन ते पाच वेळा सकस आहार करायला हवा. यात फळे, पनीर, कडधान्ये, दही, सोया, अंडी यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. तसेच हायड्रेट राहण्यासाठी लिंबाचा रस पिऊ शकता.
झोप –
महिलेने दररोज रात्री 10 ते 11 तासांची झोप घ्यायला हवी. पूर्ण झोपेमुळे न जन्मलेल्या बाळाचा रक्तप्रवाह योग्य राहतो आणि शरीराची जळजळ होत नाही.
हेही वाचा – Kidney Failure: ‘या’ चुका ठरतात किडनी निकामी होण्यास कारणीभूत
व्यायाम –
ऑफिसमध्ये सतत बसून काम असेल तर चालावे. यामुळे पायांची सूज कमी होते आणि रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. फक्त जड व्यायाम करू नये.
जास्त काम नको –
ऑफिस आणि घरातील कामांची आठवण नोटपॅडवर ठेवा. यात सर्व घरातील कामे, डॉक्टरांच्या विझिट यांच्या नोंदी कराव्यात. कामाच्यादरम्यान ब्रेक घ्यावा.
स्मोकिंग नाही –
स्मोकिंग हे आईसह बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे यापासून दूर राहा.
प्रवास –
ऑफिसला जाताना थोडे लवकर निघा, ज्यामुळे घाई होणार नाही. कितीही काही झाले तरी धावणे, घाईत चालणे टाळावे.
आरामदायी कपडे –
प्रेग्रेन्सीमध्ये शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे या दिवसात कायम आरामदायी आणि वाढत्या शरीराला बसणारे कपडे घालावेत. घट्ट कपडे घालू नयेत.
बसण्याची पोझ –
प्रेग्नेन्सीमध्ये पाठदुखी टाळण्यासाठी ऑफिसमध्ये बसताना योग्य पोझ घेऊन बसावे. जास्त वेळ उभे राहणे टाळावे. उभे राहायची वेळ झाली तरी पाय रुंद ठेवावेत. ऑफिसचेअरवर बसताना पाठीला आधार देण्यासाठी एक लहान उशी वापरावी. पायांना आधार हवा असल्यास लहान आकाराचा स्टूल घेता येईल.
या काही गोष्टी लक्षात घेतल्यास तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये काम करू शकता. पण, त्याआधी एकदा तुमच्या ग्यानोकोलॉजीस्टशी बोलून त्यांचा सल्ला नक्की घेऊ शकता.
(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा – Wedding Stess: ऐन लग्नाच्या दिवशी थकल्यासारखं का वाटतं? नवरीने ‘या’ गोष्टींकडं द्यावं लक्ष
Comments are closed.