Wedding Mandap : लग्नात मंडप का बांधतात?
तुळशीविवाहानंतर देशात लग्नाचे सनचौघडे वाजू लागले आहेत. भारतीय संस्कृतीत लग्न हा केवळ एक सोहळा नसून तो नव्या आयुष्याची सुरुवात मानली जाते. विविध समाजात वेगवेगळ्या पद्धतीने लग्न सोहळा पार पडतो. लग्न जुळण्यापासून ते लग्न होईपर्यंत अनेक विधी, परंपरा पार पाडतात. पण, सोहळ्यात एक गोष्ट सारखी दिसते ती म्हणजे लग्नातील आणि लग्नघराबाहेरील मंडप. आज लग्न मंडप भव्य आणि आकर्षक झाले असले तरी ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. लग्न गावी अंगणात असो की शहरात हॉलवर नवरा-नवरीच्या दाराबाहेर मंडप हमखास बांधला जातो. चला जाणून घेऊयात यामागील रंजक कारण,
मंडप का महत्त्वाचा?
हिंदू धर्मातील लग्नाबाबतीतच्या जुन्या परंपरा आजही पाळल्या जातात. लग्नासाठी घराबाहेर मंडप बांधणे ही त्यापैंकी एक परंपरा आहे. लग्नाचा केंद्रबिंदू म्हणून मंडपाकडे पाहिले जाते. या मंडपात लग्नाचे सर्व विधी पार पडतात. तसेच वधुवरांसाठी लग्नमंडप ही जागा सर्वात सुरक्षित मानली जाते. तसेच घराबाहेर जो मंडप उभारला जातो त्यामुळे लग्नाला भव्य स्वरुप प्राप्त होते आणि घराची शोभाही वाढते. आता हॉल घेऊन लग्न केले जातात. पण पूर्वी दाराबाहेर अंगणात लग्न लावली जायची. पूर्वी घरांमध्ये लग्न करणे शक्य नव्हते त्यामुळे घराबाहेर मंडप बांधले जात असतं.
मंडपातील खांबाना असते विशेष महत्त्व –
लग्नमंडप चार खांबाचा असतो. हे चार खांब प्रेम, विश्वास, आदर आणि समज यांचे प्रतीक असतात. याशिवाय चौरसाकृती मंडप सकारात्मक ऊर्जा आणि समतोल राखण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे लग्नात मंडपाला विशेष महत्त्व आहे.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ त्याची हमी देत नाही.)
हेही वाचा – Kanyadaan: आई वडील नसतील तर मुलीचे कन्यादान कोणी करावे?
Comments are closed.