Winter Health : ही हिरवी भाजी हिवाळ्यात ठरते सुपरफूड, वाचा भन्नाट फायदे
‘चाकवत’ ही पालेभाजी हिवाळ्यात बाजारात दिसू लागते. ही भाजी अनेक पोषकतत्वांनी परिपूर्ण असून आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. विविध नावांनी चाकवत ओळखली जाते. कुठे ‘चंदनबटवा’ तर कुठे ‘बथुआ’ या नावाने ओळखली जाते. आयुर्वेदानुसार या भाजीला नैसर्गिकपणे शरीर डिटॉक्स करणारी भाजी म्हटले जाते. यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी, ऍटीॉक्सिडंट्सने समृद्ध आहे. त्यामुळे हिवाळ्यात शरीर मजबूत ठेवण्यासाठी ही भाजी अवश्य खावी, असे सांगितले जाते.
चाकवत खाण्याचे फायदे –
- रानात मिळणारी ही भाजी फायबरने समृद्ध आहे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते आणि अपचन, गॅसचा त्रास होत नाही.
- वेट लॉसच्या प्रयत्नात असाल तर या भाजीचा आहारात अवश्य समावेश करावा. या भाजीत कॅलरीजचे प्रमाण जास्त नसते. तसेच प्रोटिन्स अधिक असतात. त्यामुळे चाकवत वेट लॉससाठी उत्तम पर्याय आहे.
- चाकवत भाजी शरीरातील रक्त शुद्ध करते आणि मऊ त्वचा मिळण्यास मदत करते. तुम्हाला मुरूमे, पुरळ अशा समस्या असतील तर चाकवत खावी.
हेही वाचा – Squatting Toilet VS Sitting Toilet: घरात कुठलं टॉयलेट तुमच्यासाठी जास्त फायदेशीर इंडियन की वेस्टर्न?
- दृष्टी सुधारण्यासाठी चाकवत खाणे फायदेशीर ठरेल. या भाजीतील झिंक आणि लोह दृष्टी सुधारण्यासाठी आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
- केस विरळ होण्याचा त्रास असेल तर चाकवत खा. या भाजीतील प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, खनिजे केसांची मुळे मजबूत करतात.
- हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढतो. त्यावर उपाय म्हणून तुम्ही चाकवत खाऊ शकता. यातील कॅल्शियम, फॉस्फरस हाडे मजबूत करतात.
- चाकवतमध्ये मुबलक पाणी असते. त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत मिळते.
(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा – Kidney Failure: ‘या’ चुका ठरतात किडनी निकामी होण्यास कारणीभूत
Comments are closed.