Papaya Face Pack : निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी वापरा पपईचा फेसपॅक

चमकदार, निरोगी त्वचेसाठी महिला बाजारातील महागडी स्किनकेअर प्रॉडक्ट आणि ट्रिटमेंटचा वापर करतात. पण, दरवेळेला या प्रॉडक्ट आणि ट्रिटमेंटचा हवा तसा परिणाम मिळतोच असे नाही. याशिवाय या दोन्ही पद्धती खिशाला कात्री देणाऱ्या असतात. अशा परिस्थितीत तुम्ही नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास निरोगी त्वचा मिळवू शकता. त्यांपैंकी एक आहे पपई. पपई ही त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे. यातील पपेन इन्झाइम आणि अन्य नैसर्गिक घटक त्वचेसाठी लाभदायी आहेत. आज आपण जाणून घेऊयात पपई चेहऱ्यासाठी कशी वापरता येईल.

पपईतील गुणधर्म –

पपईतील व्हिटमिन C, A त्वचेसाठी फायदेशीर आहे. या घटकांमुळे त्वचेवरील डाग दूर होऊन त्वचा उजळते. तसेच त्वचेवरील मृत पेशी काढून नवी पेशी निर्माण करण्यास पपई उपयुक्त आहे. तुम्ही याचा वापर फेसपॅक स्वरूपात करू शकता.

हेही वाचा – Tanning Removal Face Packs: हिवाळ्यातही होऊ शकतो चेहरा टॅन; ते कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात हे फेस पॅक

फेस पॅक –

साहित्य –

  • पपई करा
  • हळद
  • तूप
  • तुळशीचे पाणी

बनवण्याची पद्धत –

  • पपईचा ताजा तुकडा घेऊन त्यातील गर काढून घ्यावा.
  • यात अर्धा चमचा तूप आणि थोडं तुळशीचे पाणी मिक्स करावे.
  • पॅक जास्त पातळ करू नये.
  • तयार पॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावावा.
  • पॅक सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.

फायदे –

फेस पॅकमधील हळद त्वचा उजळवेल आणि तूप त्वचेला हायड्रेट करते. तुळशीतील पाणी त्वचेला विविध संसर्गापासून दूर ठेवतात.

हेही वाचा – Winter Footwear: हिवाळ्यात स्टायलिशसह आरामदायी लूकसाठी ट्राय करा हे फुटवेअर

Comments are closed.