Hair Growth Tips: लांब केसांसाठी काय करावं? तज्ञांनीच सांगितले रामबाण उपाय
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे केसांची निगा राखणं कठीण जातं. त्यासाठी आपण बरेच उपाय करतो मात्र तरीही परिणाम दिसत नाही. मात्र तज्ञांच्या मते, शरीरासह निरोगी त्वचा आणि केसांसाठी योग्य आणि संतुलित आहार घेणं देखील गरजेचं आहे. जर शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळाली नाहीत तर केस मजबूत होणार नाहीत. त्यामुळे लांब केसांसाठी तज्ञांनी ४ प्रभावी उपाय सांगितले आहेत. ( Long Hair Natural Remedies )
संतुलित आहार
लांब आणि निरोगी केसांसाठी संतुलित आहार घेणं ही प्राथमिकता आहे. आहारात अंडी, मसूर डाळ, चिकन, दही पदार्थ घ्यावे. यासह खोबरेल तेल, एवोकॅडो, बदाम आणि अक्रोड आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेल्या भाज्या आणि फळे खावी. यामुळे चयापचय सुधारते आणि केसांच्या गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम होतो.
व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढा
व्हिटॅमिन डीची कमतरता हे केस गळतीचे सर्वात मोठे आणि प्रमुख कारण आहे. त्यामुळे शरीरात या महत्त्वाच्या व्हिटॅमिनची कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी दररोज १०-१५ मिनिटे उन्हात घालवा. आवश्यक असल्यास, तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर तुम्ही व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स
ओमेगा-३ फॅटी अॅसिड्समुळे टाळूतील जळजळ, केसांतील कोरडेपणा दूर होतो आणि केसांची मूळे मजबूत होतात. यासाठी तुमच्या आहारात जवसाच्या बिया, अक्रोड, चिया बिया, मासे इत्यादी पदार्थांचा समावेश करावा.
प्रथिने
याव्यतिरिक्त केसांच्या वाढीसाठी प्रथिने महत्त्वाचे असते. जर शरीरात प्रथिनेची कमी असेल तर केस कमकुवत आणि निर्जीव होतात. त्यामुळे आहारात प्रथिनयुक्त पदार्थ घ्यावे तसेच गरज असल्यास चांगल्या दर्जाचे प्रथिन सप्लिमेंट घेऊ शकता. या सोप्या गोष्टींकडे लक्ष दिले तर तुमच्या केसांची वाढ जलद होते आणि केस निरोगी राहतात.
Comments are closed.