Periods Health : मासिक पाळीत अंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवा
मासिक पाळीत महिलांना पोटदुखी, पेटके, थकवा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या दिवसात महिलांनी स्वत:ची घेणे आवश्यक असते. कारण थोडासा सुद्धा निष्काळजीपणा महिलेच्या जीवावर बेतू शकतो. मासिक पाळीत संसर्गाचा धोका अधिक असतो त्यामुळे या दिवसात दोन वेळा अंघोळ करण्याचा सल्ला देतात. पण, पाळीदरम्यान अंघोळ करण्याची योग्य पद्धत अनेक जणींना ठाऊक नसते. आज आपण मासिक पाळीत अंघोळ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात पाहूयात.
दोन वेळा अंघोळ का करावी?
मासिक पाळीत अंघोळ कोमट पाण्याने करावी. कोमट पाण्याने वेदना कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय संसर्गाचा धोका कमी होतो आणि दुर्गंधी जाणवत नाही.
या गोष्टी लक्षात ठेवा –
- काही महिला अंघोळ करतानाही पॅड किंवा कप वापरतात. पण, अशी चूक करू नये. अंघोळ करतानाॉ रक्तस्त्राव होत असेल तर होऊ द्यावा. अंघोळ करताना पॅड आणि टॅम्पॉन्स काढावेत.
हेही वाचा – Winter Health: तुम्हालाही इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते? तज्ञांनी सांगितली गंभीर कारणं, वेळीच उपाय महत्त्वाचे
- अंघोळीसाठी बाथटब वापरणार असाल तर पूर्णपणे स्वच्छ असेल याची खात्री करावी. याशिवाय तुम्ही अंघोळ केल्यावरही स्वच्छ करण्यास विसरू नका.
- अंघोळ करताना योनी स्वच्छ करताना कोणत्याही प्रकारचे रासायनिक किंवा सुगंधी प्रॉडक्ट वापरू नयेत. या प्रॉडक्टमधील रसायनांमुळे योनीत संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी नेहमी साधे पाणी वापरावे.
- योनी आतून कधीही स्वच्छ करू नये. अनेकांना अशी सवय असते पण, योनी अतिशय संवेदनशील असते. योनीत कोणतेही रसायन गेल्यास योनीमार्गात जळजळ होऊ शकते. तसेच पीएच संतुलन बिघडू शकते. त्यामुळे योनी कायम बाहेरून स्वच्छ करावी.
(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा – Jaggery : आरोग्यासाठी काळा की पिवळा गूळ उत्तम?
Comments are closed.