Menopause Symptoms : मेनोपॉज जवळ आल्याची लक्षणे कोणती?
महिलांमध्ये मासिक पाळी बंद होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला मेनोपॉज असे म्हणतात. मेनोपॉज म्हणजे महिलेच्या आयुष्यातील प्रजननक्षमता संपुष्टात आल्याचे लक्षण आहे. जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा पाळी येणे बंद होते आणि त्यानंतर महिला बाळाला जन्म देऊ शकत नाही. तज्ज्ञांच्या मते, वयाच्या 45 ते 52 दरम्यान मेनोपॉज येऊ शकतो. तर काही केसेसमध्ये चाळीशी किंवा त्याआधीच महिलांना मेनोपॉज सुरू होतो. मेनोपॉज सुरु होण्याआधी महिलेच्या शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. कोणती आहेत ही लक्षणे जाणून घेऊयात.
घाम येणे –
मेनोपॉज जवळ आल्यास घाम येण्याचे प्रमाण वाढते. शरीर सतत गरम असल्याचे जाणवते. छातीत आणि मानेजवळ गरम जाणवायला लागते.
मनस्थिती –

पाळीच्या दिवसात होतात त्यापेक्षा जास्त मूडस्विंग्स होतात. उदास असल्यासारखे वाटते. योनीजवळ सतत खाज येते. कोरडेपणा जाणवू लागतो.
हेही वाचा – Pregnancy Tips : प्रेग्रेन्सीमध्ये नोकरी घर सांभाळताना तारांबळ उडते? या टिप्स करा फॉलो
रक्तस्त्राव कमी होतो –

मेनोपॉज सूरू होण्याआधी पाळी कमी होते. रक्तस्त्राव देखील कमी जास्त होतो. पाळीच्या चक्रातही बदल जाणवू लागतात.
हाडे खिळखिळी होतात –

मेनोपॉजनंतर एस्ट्रोजेनचा थर कमी होऊन हाडांची घनता कमी होते. हाडांमध्ये आजार वाढू लागतात.
झोपेत व्यत्यय –

मेनोपॉजच्या काळात महिलांना निद्रानाशेची समस्या जाणवते. रात्री अचानक जाग येणे, अपूर्ण झोप समस्या सुरू होतात.
त्वचा आणि केसांवर उपाय –

मेनोपॉजच्या काळात हार्मोनल असंतुलनामुळे त्वचेची चमक कमी होते तसेच केसांची गुणवत्ता खराब होते. केस पातळ होतात आणि निर्जीव दिसू लागतात.
(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा – Periods Health : मासिक पाळीत अंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवा
Comments are closed.