Cinnamon : छोट्याशा दालचिनीने आणा चेहऱ्यावर ग्लो
खड्या मसाल्यातील दालचिनी केवळ पदार्थाची चव वाढवत नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. दालचिनीत त्वचा निरोगी ठेवणारे अनेक पोषकतत्वे असतात. तुम्ही नियमितपणे दालचिनीचा वापर चेहऱ्यासाठी केलात तर नक्की चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो. आज आपण जाणून घेऊयात दालचिनी चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी कशी वापरावी.
- दालचिनीत ऍटीऑक्सिडंट्स आणि ऍटी-इफ्लेमेंटरी गुणांनी समृद्ध आहे. दालचिनीतील हे गुणधर्म त्वचेच्या समस्या दूर करतात आणि रंग उजळवतात.
- दालचिनीपासून बनवलेले डिटॉक्स पाणी आणि पावडर त्वचेचे आरोग्य उत्तम राखते. तुम्ही दालचिनीपासून फेस पॅक बनवू शकता.
हेही वाचा – Tanning Removal Face Packs: हिवाळ्यातही होऊ शकतो चेहरा टॅन; ते कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात हे फेस पॅक
- दालचिनीमध्ये त्वचेला मऊ बनवून त्वचेची चमक वाढवतात.
- दालचिनीतील ऍटीऑक्सिडंट्स त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत करतात.
- मुरुमांची समस्या असल्यास दालचिनी वापरावी. यातील ऍक्टिबॅक्टेरियल गुणधर्म बॅक्टेरिया मारतात.
कसा कराल वापर ?
दालचिनी आणि मध –
- दालचिनी आणि मध एकत्र करून त्याची पेस्ट बनवावी.
- तयार पेस्ट चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावा.
- यानंतर फेसपॅक स्वच्छ धुवून टाका.
दालचिनी आणि दही –
- दालचिनी पावडरमध्ये दही मिसळा आणि त्याचा स्क्रब तयार करा.
- तयार स्क्रब चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा.
- या स्क्रबमुळे त्वचा चमकदार बनेल.
हेही वाचा – फेस ब्युटीच्या नादात महिलांचा अजब प्रयोग,पीरियड ब्लड फेस मास्क ट्रेंडने उडवली खळबळ
Comments are closed.